शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
4
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
6
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
7
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
8
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
9
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
10
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
11
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
12
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
13
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
14
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
15
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
16
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
17
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
18
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
19
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा

शिवसेनेची कसोटी, श्रमजीवी भाजपासोबत, रूपेश म्हात्रेंनाही धोक्याची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 6:57 AM

जि. प.च्या निवडणुकीत भिवंडी तालुक्यातील ग्रामीण व भिवंडी पूर्व मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपाने भिवंडी महापालिका निवडणुकीत वापरलेला ‘फोडा आणि राज्य करा’ हाच फॉर्म्युला वापरला आहे.

- रोहिदास पाटीलअनगाव : जि. प.च्या निवडणुकीत भिवंडी तालुक्यातील ग्रामीण व भिवंडी पूर्व मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपाने भिवंडी महापालिका निवडणुकीत वापरलेला ‘फोडा आणि राज्य करा’ हाच फॉर्म्युला वापरला आहे. भाजपाने श्रमजीवी संघटनेचा पाठिंबा मिळवल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. याचा फटका ग्रामीण मतदारसंघाला बसणार आहेच पण पूर्व मतदारसंघालाही बसणार असल्याने आमदार रूपेश म्हात्रे यांच्यासाठीही धोक्याची घंटा मानली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवेसेनेची खºया अर्थाने परीक्षा आहे.मागील निवडणुकीत शिवसेनेसोबत श्रमजीवी संघटना असल्याने सेनेचे शांताराम मोरे आमदार म्हणून विजयी झाले. हा विजय भाजपाच्या जिव्हारी लागला. तेव्हापासून खासदार कपिल पाटील यांनी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माजी आमदार विवेक पंडित यांची भेट घेत चर्चा केली. पुढील होणाºया निवडणुका श्रमजीवीने भाजपासोबत लढवाव्यात यासाठी आग्रह धरला. यासाठी पाटील यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री आणि पंडित यांच्या भेटी घडवून आणल्या. अखेर आदिवासींच्या समस्या भाजपाच सोडवू शकतो, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून पंडित यांना देण्यात पाटील यांची सरशी झाली. संघटनेच्या पाठिंब्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा भाजपाला होणार आहे.भिवंडी तालुक्यात जिल्हा परिषदेचे २१ गट आणि पंचायत समितीचे ४२ गण आहेत. सर्वाधिक सदस्य भिवंडीतून निवडून जाणार असल्याने जि. प.चा अध्यक्ष कोणत्या पक्षाचा होणार हे भिंवडी तालुका ठरवणार आहे. भिवंडी महापालिकेत निवडणुकीनंतर काँग्रेसच्या मदतीला शिवसेना धावल्याने जि. प. निवडणुकीत काँग्रेस सेनेसोबत राहील असे संकेत होते. मात्र काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुरेश टावरे यांनी दिली. यामुळे सेनेला आणखी एक धक्का बसला आहे. तर सेनेने सत्तेची गणिते जुळवण्यासाठी आरपीआय सेक्युलरचे श्यामदादा गायकवाड यांच्यासोबत हातमिळवणी करून भाजपाला शह देण्याचा प्रयत्न केला आहे.भाजपाने श्रमजीवी संघटनेला जि.प.चे दोन गट तर पंचायत समितीच्या चार जागा दिल्या आहेत. तर शिवसेनेने राष्ट्रवादीला जि.प.च्या दोन व दोन पंचायत समितीची उमेदवारी जाहीर केली आहे. तर आघाडीमधून काडीमोड घेणाºया मनसेने मात्र पडघा जि.प. गटात सेनेशी युती करून एक पंचायत समितीचा गण पदरात पाडत पाठिंबा दिला आहे. तर या निवडणुकीत भाजपाच्या जुन्या पदाधिकाºयांना उमेदवारी नाकारून नव्या भाजपावाल्यांना उमेदवारी दिल्याने नाराजी आहे. त्याचा फटका भाजपा उमेदवारांना बसू शकले अशी अटकळ बांधली जात आहे.श्रमजीवीने काडीमोड घेतल्याने शिवसेनेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीत लक्ष घातल्याने कार्यकर्ते कामाला लागले आहेत. सेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, संपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे, सहसंपर्कप्रमुख देवानंद थळे, तालुकाप्रमुख विश्वास थळे, तालुका संर्पकप्रमुख कुंदन पाटील, कृष्णकांत कोंडलेकर, पंडित पाटील, प्रभूदास नाईक, राजू चौधरी, प्रवीण पाटील, विष्णू चंदे, नीलेश गंधे, किरण चन्ने, राष्ट्रवादीचे इरफान भुरे, गणेश गुळवी हे कामाला लागले आहेत. तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे, तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे, मोहन अंधेरे, देवेश पाटील, श्रीकांत गायकर, नारायण पाटील, दयानंद पाटील, संघटनेचे बाळाराम भोईर, दत्तात्रेय कोलेकर, अशोक सापटे, प्रमोद पवार, संगीता भोमटे, जया पारधी हे रिंगणात आहेत.श्रमजीवी संघटना सोबत असती तर निवडणुकीत चित्र बदलायला नक्कीच मदत झाली असती. या संबंधी संघटनेचे संस्थापक विवेक पंडीत यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. शिवसैनिक कामाला लागले असून विजय एकाधिरशहाशीचा होतो की सत्याचा हे मतदार ठरवतील.- प्रकाश पाटील,ग्रामीण जिल्हापमुख, शिवसेनाश्रमजीवी संघटना आदिवासी व गरीबांच्या हक्कासाठी अनेक वर्षांपासून लढत आहे. कुपोषण, रोजगार, आरोग्य, शिक्षण, कामगारांचे प्रश्न सुटलेले नाहीत. ते सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याचे संघटनेने एकमताने ठरवले आहे.- विवेक पंडित,संस्थापक, श्रमजीवी संघटना.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना