भिवंडी : शहरालगत असलेल्या कारीवली गावात वीजग्राहकांच्या तक्रारीवरून वीज दुरूस्तीसाठी गेलेल्या वीज कर्मचा-यांना मारहाण करणा-या जिल्हा परिषद सदस्य व सरपंचासह त्यांच्या भावाने मारहाण केल्याने तिघांना आज भिवंडी कोर्टात हजर केले असता त्यांना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.या घटनेमुळे परिसरांत खळबळ माजली आहे.मागील महिन्यात कारीवली गावांत अचानक वीज जाणे,वीज पुरवठ्यात बिघाड होणे व अनाधिकृत वीज केबलचे जाळे वाढणे अशा वीज ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या होत्या.त्यामुळे वीज पुरवठा करणा-या टोरेंन्ट वीज कंपनीच्या दुरूस्ती पथकाने कारीवली गावात जाऊन दुरूस्तीची कामे सुरू केली. त्यावेळी गावातील एका जमावाने कर्मचा-यांना शिवीगाळी करीत मारहाण करीत होती. त्यामुळे वीज कंपनीच्या अधिका-यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात १५ ते २० जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य गोकुळ नाईक,सरपंच देवराज नाईक व त्यांचा भाऊ निलम नाईक यांच्यासह अनेकांच्या नांवे नोंद केली होती. या गुन्ह्यातील काही जणांना पोलीसांनी अटक करून कोर्टात हजर केले होते.परंतू शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य गोकुळ नाईक,कारीवलीचे सरपंच देवराज नाईक आणि त्यांचा भाऊ निलम नाईक यांनी अटकपुर्व जामिनासाठी ठाणे सेशन कोर्टात अर्ज केला होता. सेशन कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळल्यामुळे त्यांनी काल गुरूवार रोजी मुंबई हायकोर्टात अर्ज केला होता.त्यावेळी हायकोर्टाने तीन भावांना भोईवाडा पोलीस ठाण्यात हजर रहाण्यास सांगीतले. त्यानुसार तिघे नाईक बंधू आज शुक्रवार रोजी भोईवाडा पोलीस ठाण्यात हजर झाले.पोलीसांनी त्यांना अटक करून कोर्टात हजर केले असता भिवंडी कोर्टाने त्यांना २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश पोलीसांना दिले आहेत. या घटनेने तालुक्यात वीज ग्राहकांमध्ये तसेच राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
वीज कर्मचा-यांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेच्या जिल्हापरिषद सदस्य , सरपंचाला पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 10:15 PM
भिवंडी : शहरालगत असलेल्या कारीवली गावात वीजग्राहकांच्या तक्रारीवरून वीज दुरूस्तीसाठी गेलेल्या वीज कर्मचा-यांना मारहाण करणा-या जिल्हा परिषद सदस्य व सरपंचासह त्यांच्या भावाने मारहाण केल्याने तिघांना आज भिवंडी कोर्टात हजर केले असता त्यांना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.या घटनेमुळे परिसरांत खळबळ माजली आहे.मागील महिन्यात कारीवली गावांत अचानक ...
ठळक मुद्दे वीज पुरवठा करणा-या टोरेंन्ट वीज कंपनीच्या दुरूस्ती पथकाने कारीवली गावात काम सुरू केल्याने तीन भावांसह १५-२० जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली होती. शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य गोकुळ नाईक,कारीवलीचे सरपंच देवराज नाईक आणि त्यांच्या भाऊ निलम नाईक यांनी अटकपुर्व जामिनासाठी ठाणे सेशन कोर्टाने अर्ज फेटाळल्याने त्यांना हायकोर्टाने भिवंडी कोर्टात हजर रहाण्यास सांगीतले.भिवंडी कोर्टाने तीन भावांना २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश पोलीसांना दिले आहेत