शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

संकल्प प्रतिष्ठानची मनाची दहीहंडी शिवतेज महिला गोविंदा पथकाने फोडली 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 8:46 PM

ठाणे - शिवसेना आमदार रविंद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सव २०१९ च्या हंडी फोडण्याचा मान लालबागचा राजा ...

ठळक मुद्दे उत्सवाचे संपूर्ण संयोजन नगरसेविका जयश्री फाटक यांनी केले होते.हंडी फोडण्याचा मान शिवतेज महिला गोविंदा पथकाला मिळाला. त्यांना खासदार राजन विचारे हस्ते रोख रक्कम, बक्षिस आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

ठाणे - शिवसेना आमदार रविंद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सव २०१९ च्या हंडी फोडण्याचा मान लालबागचा राजा गोविंदा पथक आणि महिलांसाठी राखीव असलेली हंडी फोडण्याचा मान शिवतेज महिला गोविंदा पथकाला मिळाला. त्यांना खासदार राजन विचारे हस्ते रोख रक्कम, बक्षिस आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी सोबत सिने अभिनेते आणि उत्सवाचे सूत्र संचालक सुशांत शेलार, स्थायी समिती सभापती राम रेपाळे,  नगरसेवक मिनल संख्ये, नम्रता फाटक, उप विभाग प्रमुख राजु फाटक,  नगरसेवक भूषण भोईर, गुरुमुख सिंह, प्रतिष्ठान चे पदाधिकारी सर्वश्री बाबु महाडिक, संतोष बामणे, सुरेश कडू, अनिल पंडित, शैलेश सावंत, बाळा परब, शाखा प्रमुख तानाजी पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.यंदाचा उत्सव हा मोठ्या स्वरूपात साजरा न करता व पारंपरिक पद्धतीने कोणतीही स्पर्धा न करता एक उत्सव एक सण समजून साजरा करुन जास्तीत जास्त मदत या उत्सवाच्या माध्यमातून कोल्हापूर सांगली आणि कोकणातील शेतकऱ्यांना देण्यात येईल. असे आयोजक आमदार रविंद्र फाटक यांनी सांगितले होते. सुमारे १५० हुन अधिक पथकाने उत्सवाला भेट देऊन आपली नोंदणी केली आणि त्यातील १०० हुन अधिक पथकांनी विजयी सलामी दिली. सलामी देणाऱ्या प्रत्येक पथकाला रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह बक्षिसाची स्वरूपात करून गौरविण्यात आले. तसेच दहीकाला उत्सवामध्ये बिग बॉस फेम अभिनेत्री रुपाली भोसले हिने गोंविंदा पथक मध्ये सामील होऊन हंडी फोडून एक वेगळा उत्साह निर्माण केला. उत्सवाचे संपूर्ण संयोजन नगरसेविका जयश्री फाटक यांनी केले होते.

टॅग्स :Dahi Handiदहीहंडीthaneठाणे