भार्इंदर : मीरा-भार्इंदर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेला निधर्मीय असल्याचे प्रमाणपत्र देत भिवंडी, मालेगाव पॅटर्नची शक्यता वर्तविली होती. तर दुसºया बाजूला काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात काँग्रेस व शिवसेनेच्या विचारसरणीत फरक असल्याचे नमूद करून काँग्रेस सेनेशी आघाडी करणार नसल्याचे घूमजाव केले आहे.यंदाची पालिका निवडणूक थेट शिवसेना-भाजपात होणार असली तरी काँग्रेस सत्तेतील किंगमेकर ठरणार असल्याचे बोलले जात आहे. त्याला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनीही दुजोरा दिला. भविष्यात भिवंडी, मालेगाव पॅटर्न देखील अंमलात येण्याची शक्यता वर्तविली आहे. या शुभवार्तामुळे काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी वाढल्याचे सांगितले जात आहे. पक्षाने पहिल्यांदाच मराठी भाषेला प्राधान्य देत इच्छुकांची लेखी परीक्षा घेतली. कधी नव्हे ते काँग्रेसने मराठी भाषेचा पुरस्कार ऐन निवडणुकीच्या तोंडावर केल्याने काँग्रेसचे विचार सेनेशी जुळू लागल्याची चर्चा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांत सुरू झाली. याखेरीज राष्टÑवादीतील अनेक दिग्गज काँग्रेसमध्ये आल्याने हाताला बळ मिळू लागले.स्थानिक नेतृत्वाने पक्षाला भरघोस यश मिळवण्यासाठी तयारी सुरू केली असतानाच पक्षाने प्रसिद्धी पत्रकात काँग्रेस व सेनेच्या विचारसरणीत फरक असल्याचे नमूद केले. जिल्हाध्यक्षांनी मीरा-भार्इंदर पालिका निवडणुकीची दिशा ठरवण्याचे सूतोवाच केले असतानाच घूमजाव करणाºया पत्रकामुळे अस्वस्थता पसरली आहे. जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र त्याला दुजोरा दिला नाही.
‘सेना-काँग्रेसची विचारसरणी वेगळी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 12:42 AM