ठाणे : नऊ महिने रखडलेल्या प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक अखेर लागली आहे. ठाणे महापालिकेने येत्या २२ नोव्हेंबर रोजी ही निवडणूक घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार, या प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी अर्ज भरण्यात आले. त्यानुसार, पाच समित्यांवर शिवसेनेच्या अध्यक्षांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. तसेच एक प्रभाग समिती भाजपा, तर कळवा आणि मुंब्य्रावर राष्टÑवादीचा कब्जा असणार आहे. परंतु, कळव्यात शिवसेनेनेदेखील अर्ज भरल्याने येथे काहीशी चुरस निर्माण झाली आहे. नौपाड्यातही शिवसेनेविरोधात भाजपाने अर्ज भरला आहे.ठाणे महापालिकेत एकहाती सत्ता स्थापन केल्यानंतरही सत्ताधारी शिवसेनेला स्थायी समितीसाठी झगडावे लागत आहे. त्यामुळेच इतर समित्यांच्यादेखील निवडणुका रखडल्या होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामाचे विकें द्रीकरण व्हावे, यासाठी ७३ व्या घटनादुरुस्तीनुसार प्रभाग समित्यांची रचना केली आहे. त्यानुसार, आता तब्बल नऊ महिन्यांनंतर त्यांच्या निवडणुका लागल्या आहेत. मागील महिन्यात महासभेत शहरातील प्रभागांची पुनर्रचना करण्यात आली. १० प्रभाग समित्या एकने कमी करून नऊ करण्यात आल्या. त्यांचीच निवडणूक आता २२ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता महापालिकेत घेतली जाणार आहे. त्यानुसार, बुधवारी या समित्यांच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यात आले. त्यानुसार, कोपरी-नौपाडा येथे शिवसेना आणि भाजपात चुरस लागली आहे. येथे शिवसेनेच्या वतीने शर्मिला गायकवाड, तर भाजपाच्या वतीने सुनेश जोशी यांनी अर्ज भरला आहे.
पाच प्रभाग समित्यांवर शिवसेनेचा कब्जा, राष्ट्रवादीला दोन आणि भाजपाच्या वाट्याला एक समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 1:39 AM