शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

आयुक्तांच्या बदलीविरोधात शिवसेनेचे ठिय्या आंदोलन; आदेशाच्या प्रतींची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 3:58 PM

मीरा-भार्इंदर महापालिकेचे आयुक्त डॉ. नरेश गीते यांची भाजपा आ. नरेंद्र मेहता यांच्या तक्रारीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तडकाफडकी बदली केल्याने त्या विरोधात शिवसेनेच्या नगरसेवकांनी मंगळवारी महापौर दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करुन आदेशाच्या प्रतींची होळी करण्यात आली.

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेचे आयुक्त डॉ. नरेश गीते यांची भाजपा आ. नरेंद्र मेहता यांच्या तक्रारीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तडकाफडकी बदली केल्याने त्या विरोधात शिवसेनेच्या नगरसेवकांनी मंगळवारी महापौर दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करुन आदेशाच्या प्रतींची होळी करण्यात आली.सत्ताधाऱ्यांच्या अपारदर्शक कारभाराला खतपाणी न घालणाऱ्या आयुक्तांनी पारदर्शक कारभार करुन शहरातील विकासाला गती दिल्याचा दावा यावेळी सेनेकडून करण्यात आला. केवळ आपल्याला हवा तसाच कारभार आयुक्तांनी करावा, यासाठी सत्ताधाऱ्यांनी त्यांची दालने बंद करुन निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली. नागरीकांनी भाजपाला दिलेल्या एकहाती सत्तेचा दुरुपयोग अशाप्रकारे होत असल्याने सेनेने त्याविरोधातही आंदोलन छेडून परस्पर दालने बंद करणाऱ्या महापौर, उपमहापौर, स्थायी सभापती, सभागृह नेता व प्रभाग सभापतींवर कारवाई करण्याची मागणी यापुर्वी केली होती. केवळ सत्ताधारी असल्याने प्रशासनाने अद्याप त्यांच्यावर कारवाई केली नसली तरी आयुक्तांनी मात्र त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले. त्यांच्या कोणत्याही इशाऱ्याला बळी न पडता आयुक्तांनी आपला पारदर्शक व विकासाभिमुख कारभार सुरुच ठेवला. आयुक्त सत्ताधाऱ्यांना दाद देत नसल्याने संतप्त भाजपा आ. नरेंद्र मेहता यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे आयुक्तांच्या असहकाराची तक्रार केली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी मेहता यांच्या मर्जीप्रमाणे त्यांच्याच समक्ष सोमवारी आयुक्तांच्या बदलीचा आदेश काढला. सरकारचा हाच का पारदर्शक पणा, असा टोला लगावुन सेनेने मंगळवारी महापौर दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. यावेळी सेनेच्या नगरसेवकांनी महापौर डिंपल मेहता यांच्या विरोधात घोषणाबाजी करुन आयुक्तांच्या बदलीच्या आदेशाची होळी केली. आंदोलनात नगरसेवक हरिश्चंद्र आमगावकर, दिनेश नलावडे, अनंत शिर्के, कमलेश भोईर, प्रवीण पाटील, नगरसेविका निलम ढवण, अनिता पाटील, स्रेहा पांडे, अर्चना कदम, संध्या पाटील, तारा घरत आदींनी सहभाग घेतला होता. आदेशाच्या प्रतींची होळी करण्याचा प्रकार पालिका मुख्यालयाच्या दुसऱ्यामजल्यावर होत असतानाही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करुन सेनेच्या आंदोलनाचे समर्थन केल्याचे यावेळी दिसून आले. 

काँग्रेस देणार मुख्यमंत्र्यांना पत्रकाँग्रेसने देखील आयुक्तांच्या बदलीचा निषेध व्यक्त केला असुन मुख्यमंत्र्यांनी आ. मेहता यांच्या मर्जीनुसार त्यांची केलेली तडकाफडकी बदली आक्षेपार्ह असल्याचे गटनेता जुबेर इनामदार यांनी म्हटले आहे. भाजपाने देशात अच्छे दिन आणले नसले तरी मीरा-भार्इंदर शहरामध्ये आयुक्तांनी अच्छे दिनाची सुरुवात केल्याचा दावा त्यांनी केला. अनधिकृत बांधकामांवर धडाकेबाज तोडक कारवाई करुन त्यांनी बेकायदेशीर बांधकाम परवानग्यांना चाप लावला होता. त्यातून सत्ताधाऱ्यांची टक्केवारी बंद झाल्यानेच त्यांची आगपाखड झाल्याने त्यांनी आयुक्तांविरोधात बदलीचे षडयंत्र रचले. त्याची मुख्यमंत्र्यांनी देखील दखल घेतल्याची बाब आक्षेपार्ह असुन मुख्यमंत्र्यांनी विरोधकांसह जनमताचा कौल पाहून आयुक्तांची बदली रद्द करावी, अशा मागणीचे पत्र मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचे जुबेर यांनी सांगितले.

- सत्ताधाऱ्यांतील पदसिद्ध अधिकाऱ्यांनी १९ जानेवारीपासुन बंद केलेली दालने अद्याप खुली केली नसल्याने त्यांच्याकडील कर्मचारी अद्यापही कामाविनाच ठरले आहेत. त्यामुळे त्यांना किमान दालने खुली होईपर्यंत इतर विभागात सामावुन घ्यावे, अशी मागणी केली जात आहे. 

टॅग्स :bhayandarभाइंदर