शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

घोडबंदर किल्ल्याजवळ नऊ एकर जागेत उभी राहणार शिवसृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 12:50 AM

प्रताप सरनाईक यांची माहिती : पुरातत्त्व विभागाची मंजुरी

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतील ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे काम करण्याबरोबरच किल्ल्याच्या शेजारील मोकळ्या नऊ एकर जागेत शिवसृष्टी उभारण्याच्या कामास अखेर राज्य सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडून ना-हरकत मिळाली अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.

अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या या किल्ल्याचे जतन व सुशोभीकरण करण्याची मागणी सरनाईक यांनी सरकारकडे केली होती. हा राज्य संरक्षित किल्ला म्हणून ‘महाराष्ट्र वैभव-राज्य संरक्षित स्मारक योजने’अंतर्गत महापालिकेस संगोपनासाठी देण्याबाबतचा निर्णय सरकारने गेल्यावर्षी घेतला होता. त्यानुसार, पुरातत्त्व विभाग व मीरा- भार्इंदर पालिका यांच्यात करार झाला होता. ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पर्यटनस्थळ म्हणून घोडबंदर किल्ल्याचा समावेश करून घेण्यात सरनाईकांना यश आले होते.

या किल्ल्याशेजारी असलेल्या नऊ एकर जागेत ‘शिवसृष्टी’ उभारण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करून ही शिवसृष्टी उभारण्यासाठी महापालिकेने पुरातत्त्व विभागाकडे परवानगी मागितली होती. किल्ल्याच्या तटबंदीपासून ३५ मीटर अंतर सोडून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. किल्ल्याच्या मूळ बांधकामाला इजा पोहोचणार नाही अथवा येथील घटक नष्ट होणार नाहीत, याची दक्षता घेऊन काही अटींवर प्रकल्पासाठी परवानगी देण्यात आली आहे. घोडबंदरला खाडीकिनारा असल्याने भविष्यात येथे पर्यटकांसाठी वॉटर स्पोटर््स देण्याचा तसेच खाडीकिनारी जेट्टी बांधण्याबाबतही आमदार सरनाईक यांनी संबंधित विभागाला पत्र दिले आहे. तसेच रो-रो सेवा, वसई-ठाणे-भार्इंदर मार्गावर जलवाहतुकीला प्राधान्य मिळू शकते. त्यादृष्टीने प्रयत्नशील आहे, असे सरनाईक यांनी सांगितले.फाउंटनचे आकर्षणछत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास इतिहासप्रेमी व नव्या पिढीला समजणे गरजेचे आहे. यासाठी घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे काम करीत असताना त्यामध्ये हा प्रकल्प उभारण्याचे स्वप्न आहे. म्युझिकल फाउंटन, लॅण्डस्केपिंग गार्डनसह लाइट व साउंड शो ही असेल.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईक