लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : गेली अनेक दिवस लॉकडाऊनमुळे कामधंदा नसल्यामुळे वाघबीळ येथील रामेश्वर मनोहर दातार (३५) या बिगारी कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रामेश्वर हा विवाहित असून त्याची पत्नी घरकाम करते. तर मुलगी गावी असते. पत्नी घरकामासाठी बाहेर गेल्यानंतर रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास रामेश्वर याने जुना वाघबीळ गावातील आपल्या घरातील लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार समजल्यानंतर त्याच्या मेव्हण्याने कासारवडवली पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्याला तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तो मृत पावल्याचे सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी घोषित केले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसले तरी बेरोजगारीमुळे त्याने हा प्रकार केल्याची शक्यता स्थानिक रहिवाशांनी वर्तविली आहे.
धक्कादायक! लॉकडाऊनमुळे कामधंदा नसल्यामुळे बिगारी कामगाराची ठाण्यात आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 11:12 PM
लॉकडाऊनमुळे कामधंदा नसल्यामुळे वाघबीळ येथील रामेश्वर मनोहर दातार (३५) या बिगारी कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेने ठाणे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
ठळक मुद्देकासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हागळफास घेऊन कवटाळले मृत्युला