लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कासारवडवली वाहतूक नियंत्रण शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक अनुजा घाडगे यांच्या कारमधून चोरटयांनी २० हजारांची रोकड आणि एक मोबाईल तसेच काही महत्वाची कागदपत्रे लंपास केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्याात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ठाण्याच्या घोडबंदर रोड, मनोरमा नगर भागात राहणाºया अनुजा यांचे पती दतात्रय घाडगे (४०) यांनी त्यांची मोटारकार घोडबंदर रोड ते ठाण्याकडे जाणाºया सेवा रस्त्यावर वाईनडाईन हॉटेल शेजारी उभी केली होती. याच कारच्या डाव्या बाजूकडील काच फोडून चोरटयांनी २० हजाराची रोकड आणि मोबाईल तसेच इतर कागदपत्रे असा ऐवज लंपास केल्याचा प्रकार २६ जुलै रोजी सायंकाळी ७.१५ ते ८.१५ वाजण्याच्या दरम्यान घडला. यााप्रकरणी अनुजा यांचे पती दत्तात्रय घाडगे यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार दाखल केली आहे.
धक्कादायक! ठाण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याच्या कारमधून रोकड लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 11:57 PM
कासारवडवली वाहतूक नियंत्रण शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक अनुजा घाडगे यांच्या कारमधून चोरटयांनी २० हजारांची रोकड आणि एक मोबाईल तसेच काही महत्वाची कागदपत्रे लंपास केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.
ठळक मुद्देकासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हाघोडबंदर रोडवरील घटना