शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या जन्मदात्या पित्यास तीन वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2021 8:29 PM

आपल्याच पोटच्या मुलीचा विनयभंग करणाºया ५० वर्षीय पित्याला तीन वर्षे सक्तमजूरीची तसेच दहा हजारांच्या दंडाची शिक्षा ठाणे जिल्हा आणि विशेष पोस्को न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांनी शुक्रवारी ठोठावली आहे.

ठळक मुद्देठाणे जिल्हा न्यायालयाचा आदेशमीरा रोड येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: आपल्याच पोटच्या मुलीचा विनयभंग करणाºया ५० वर्षीय पित्याला तीन वर्षे सक्तमजूरीची तसेच दहा हजारांच्या दंडाची शिक्षा ठाणे जिल्हा आणि विशेष पोस्को न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांनी शुक्रवारी ठोठावली आहे. दंड न भरल्यास तीन महिन्यांची अतिरिक्त शिक्षाही न्यायालयाने सुनावली.मीरा-भार्इंदर व वसई- विरार पोलीस आयुक्तालयाच्या निर्मितीनंतर तसेच न्यायाधीश ब्रह्मे यांनी ही ठाणे न्यायालयात सुनावलेली पहिलीच शिक्षेची घटना आहे. आरोपी, तक्र ारदार आई आणि पीडित मुलगी असे तिघे १ आॅगस्ट २०१४ रोजी रात्रीचे जेवण करून घरात झोपले होते. त्यावेळी आरोपीने १ आॅगस्ट रोजी रात्री ११ ते २ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान आपल्याच मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पिडितेने या प्रकाराची माहिती तिच्या आईला दिली. याचा जाब विचारल्यानंतर पित्याने तिच्या आईलाच शिवीगाळ करीत मारहाण केली. मुलीच्या आईने अखेर मीरा रोड पोलीस ठाण्यात या नराधम पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक सुरेश खेडेकर आणि सहायक पोलीस निरीक्षक पी. एस. साळुंखे यांच्या पथकाने आरोपीला अटक केली होती. तपासाअंती याप्रकरणी ठाणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला न्यायाधीश ब्रह्मे यांच्या न्यायालयात आल्यानंतर सरकारी वकील संजय मोरे यांनी भक्कम पुरावे सादर करीत तीन साक्षीदार हजर करुन आरोपीला शिक्षा देण्यासाठी जोरदार बाजू मांडली. यामध्ये साक्षीदारांची साक्षही महत्वाची ठरली. त्याच आधारे आरोपीला दोषी ठरवून त्याला तीन वर्षे कारावासासह दहा हजार रु पये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंडातील पाच हजार रु पये पीडितेला आणि उर्वरित पाच हजार रुपये शासनाकडे जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दंड न भरल्यास तीन महिन्यांची अतिरिक्त शिक्षाही सुनावली. न्यायालयीन पैरवी अधिकारी म्हणून पोलीस अंमलदार श्रीराम भोसले यांनी काम पाहिले.

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालयMolestationविनयभंग