लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : घोडबंदर रोडवरील एका दुकानाची भिंत फोडून चोरलेल्या मोबाइलची विक्री करणा-या बिंदू हरिजन (१९) याच्यासह पाच जणांच्या टोळीला कासारवडवली पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत २३ मोबाइल हस्तगत केले आहेत. पाचही आरोपी हे बांधकाम साईटवरील मजूर आहेत.कासारवडवलीनाक्यावर उमेदसिंग राठोड यांचे मोबाइल विक्रीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे ११ फेब्रुवारी २०२० रोजी रात्री त्यांनी दुकान बंद केल्यानंतर ते घरी गेले होते. दुसºया दिवशी १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ते दुकानावर आले. त्यावेळी दुकानाच्या पाठीमागील भिंत फोडून चोरट्यांनी दुकानातील एक लाख ७० हजारांचे २६ मोबाइल लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. काही कारणास्तव गावी जावे लागल्यामुळे त्यांनी २१ फेब्रुवारी रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर जाधव, उपनिरीक्षक कुलदीप मोरे, पोलीस हवालदार अंकुश पाटील आणि पोलीस नाईक प्रविण घोडके आदींचे पथक या प्रकरणाचा तपास करीत होते. दरम्यान, आनंदनगर येथील ठाणे परिवहन सेवेच्या बस आगाराबाहेर काही व्यक्ती चोरून नवीन मोबाइलची अल्पदरांमध्ये विक्र ी करीत असल्याची ‘टीप’ पोलीस उपनिरीक्षक कुलदीप मोरे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली. तेंव्हा पोलिसांना पाहून हे टोळके पळू लागले. अखेर पोलिसांनी पाठलाग करून बिंदू हरिजन, पृथ्वीराज गौड (१९), मोहम्मद आजम अहमदअल्ली (२२), मोहम्मद परवेज शेख (१९) आणि दिलीपकुमार चमार (२३) या पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडील बॅगेमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे १५ मोबाइल हस्तगत केले. त्यांना बोलते केल्यानंतर त्यांनी ११ फेब्रुवारी रोजी कासारवडवली येथील दुकानातून ही चोरी केल्याची कबुली दिली. हे सर्वजण मूळचे उत्तरप्रदेशचे रहिवाशी असून सखोल चौकशीमध्ये त्यांच्याकडून आणखी आठ असे २३ मोबाइल पोलिसांनी जप्त केले. उर्वरित तीन मोबाइल उत्तरप्रदेशमध्ये असल्याची माहिती त्यांनी दिली.* २६ फेबु्रवारीपर्यंत पोलीस कोठडीविशेष म्हणजे हे सर्वजण त्याच परिसरातील एका बांधकाम साईटवर मजुरीचे करतात. या पाचही जणांना २६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यांनी आणखी अशा प्रकारे कुठे चोºया केल्या आहेत का? याबाबतचा तपास करण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खैरनार यांनी सांगितले.
धक्कादायक ! ठाण्यात दुकान फोडून मोबाइल लंपास करणारे पाच बांधकाम मजूर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 8:37 PM
घोडबंदर रोडवरील एका बांधकाम साइटवर मजूरीचे काम करणाऱ्या पाच मजूरांनीच मोबाइलचे दुकाने फोडून एक लाख ७० हजारांचे २६ मोबाईल चोरले होते. त्यांना या मोबाइलची विक्री करतांना कासारवडवली पोलिसांनी रंगेहाथ पकडले.
ठळक मुद्दे२३ मोबाइल हस्तगतकासारवडवली पोलिसांची कामगिरीविक्री करतांना अडकले जाळ्यात