शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
2
'बलात्कार, व्हिडीओ अन् दुसऱ्यांसोबत ठेवायला लावले संबंध'; भाजपा आमदारावर गुन्हा
3
विधानसभेपूर्वी तुतारी हाती घेणार?; चर्चेनंतर भाजप आमदार अश्विनी जगताप यांचं स्पष्टीकरण 
4
मोदींच्या पोस्टवर वीरेंद्र सेहवागची प्रतिक्रिया; पण काही वेळातच पोस्ट केली डिलीट, कारण...
5
आरक्षणाचा वाद: “मनोज जरांगे पाटील यांना ‘बिग बॉस’मध्ये घ्या”; लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला
6
"महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे आणखी एक प्रकल्प गुजरातकडे गेला", विजय वडेट्टीवारांची टीका
7
Gold Silver Price 19 Sep: सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, चांदी मात्र चमकली; पाहा नवे दर
8
‘’पाकिस्तानने आधी आपला देश सांभाळावा, मग…’’, कलम ३७० वरून ओमर अब्दुल्लांचं प्रत्युत्तर   
9
अक्षय अन् अमिताभ हे सरकारी जाहिरातींसाठी किती मानधन आकारतात ? ऐकून बसेल धक्का!
10
'काँग्रेस आणि पाकिस्तानचा एकच अजेंडा', 370 च्या मुद्यावरुन अमित शाह यांची जोरदार टीका
11
तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला बच्चू कडू गैरहजर; "मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर...", पहा काय चर्चा केली जाईल
12
अभिनयच नाही तर बिझनेस मध्येही हिट! माधुरी दीक्षितनं 'या' कंपनीत केली कोट्यवधींची गुंतवणूक
13
मुलाला अटक होताच आमदारानं केलं सरेंडर; घरात सापडला १७ वर्षीय तरुणीचा मृतदेह 
14
जग्गू दादाचा वर्षा उसगांवकरांना पाठिंबा, कौतुकही केलं, म्हणाले "तू भारीच आहेस, Good Luck"
15
Video - सेल्फीचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर उभा असताना आली ट्रेन, 1 सेकंद उशीर झाला असता तर...
16
"स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवलात, तर...", ठाकरेंचं शिंदेंवर टीकास्त्र, भाजपाला सवाल
17
कोण आहेत मुकेश अहलावत? ज्यांना दिल्लीतील आतिशींच्या मंत्रिमंडळात मिळालं स्थान
18
"लॉरेन्स बिश्नोईला पाठवू?" भल्या पहाटे सलीम खान यांना धमकी, बुरखाधारी महिलेने रस्ता अडवून...
19
जम्मू-काश्मीरच्या विनाशाला तीन कुटुंबे जबाबदार; श्रीनगरमधून PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
20
"'वन नेशन वन इलेक्शन' म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव"

धक्कादायक! २.२८ कोटी रुपयांची जमीन अवघ्या साडेपाच लाखांना विकली; असा रचला बनाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 6:44 AM

बनावट कागदपत्रांवर जमीन विक्रीप्रकरणी एकास अटक.

लोकमत न्यूज नेटवर्क , मीरा रोड : तोतया वारस दाखवून अन्य भाऊ मयत झाल्याचे खोटे दाखले, तसेच कागदपत्रे बनवून जमीन विक्री प्रकरणातील तोतया वारसास भाईंदर पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे. ही जमीन शासकीय दरानुसार सव्वादोन कोटींची असताना ती अवघ्या ५ लाख ५१ हजारांत तिची विक्री केली होती. शिवाय अन्य सात जमिनीसुद्धा विक्रीचा प्रयत्न चालवला होता. 

कर्नाटकच्या बंगलोर येथे राहणारे  दीपक शशिकांत शहा यांच्या फिर्यादीवरून भाईंदर पोलिस ठाण्यात २० मार्च २०२४ रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दीपक यांचे वडील शशिकांत जिवंत असून, काका प्रवीण हरगोविंदास शहा, सूर्यकांत व हरकिशन यांचे निधन झालेले आहे. या कुटुंबाच्या भाईंदर येथे जमिनी असून, काही जमिनी पुरुषोत्तम पटेल यांना लीजवर दिल्या होत्या. 

प्रवीण हे मयत झाले असताना त्यांच्या अधिकारपत्राद्वारे जमीन विक्रीची कागदपत्रे अजय यांनी दीपक व कुटुंबीयांना कळवली. त्यानंतर माहिती घेतली असता चंद्रकांत प्रभुदास घेलाणी (रा. अहमदाबाद, गुजरात) याला प्रवीण शहा दाखवून त्या नावाचा आधार कार्ड, पॅन कार्ड बनवले. गुजरातच्या अमरेली येथील न्यायालयाची दिशाभूल करून खोटे शपथपत्र आदींच्या आधारे अन्य तिघे भाऊ मयत असून, त्यांना कोणी वारस नाही आणि तोतया प्रवीण हा भाईंदर येथील जमिनींचा एकमेव वारस असल्याचा आदेश मिळवला.

ट्रस्टसाठी विक्री केलीतोतया प्रवीण याने त्याच्या आठ जमिनी पेशइमाम मोहंमद अब्दुल रऊफ (रा. गोम्स चाळ, कुर्ला पश्चिम) याला अधिकारपत्र दिले होते. एक जमीन तोतया प्रवीण याने बाजारमूल्य दोन कोटी २८ लाख असताना ती फक्त पाच लाख ५१ हजारांत देवेंद्र मणीलाल धासवाला (रा. गोरेगाव पश्चिम) व सुरेश जादवनकुम (रा. मालाड) यांना द बॉम्बे सतवारा ज्ञाती ट्रस्टसाठी विक्री केली होती. अमरेली येथील न्यायालयाची दिशाभूल करून खोटे शपथपत्र आदींच्या आधारे अन्य तिघे भाऊ मयत असून, त्यांना कोणी  वारस नाही.

२८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी- कागदपत्रांमध्ये तसेच ओळखपत्रांमध्ये पत्ता चुकीचा असल्याने तोतया प्रवीण सापडत नव्हता. - सहायक आयुक्त दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विवेक सोनावणे, उपनिरीक्षक प्रसाद गोवलेसह, राजेश पानसरे, रवींद्र भालेराव, जानन चव्हाण, राहुल काटकर यांनी  तपास करत तोतया प्रवीण ऊर्फ चंद्रकांत घेलाणी याला अहमदाबादमधून २४ ऑगस्ट रोजी अटक केली. - ठाणे न्यायालयाने त्याला २८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी