लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: घोडबंदर रोडवरील पातलीपाडा भागात वीज वितरण कंपनीच्या पावर हाऊसजवळून एका बिबटयाने भटक्या कुत्र्याला उचलून नेल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. ही माहिती स्थानिकांनी ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. मात्र, बिबटयाची चाहूल लागली नसल्याचे ठाणे वनविभागाने स्पष्ट केले.ठाण्यातील पातलीपाडा पॉवर हाऊस याठिकाणी एक बिबटया आढळून आला असून त्याने या परिसरातील एका भटक्या कुत्र्याची शिकार केली. शिकारीनंतर या कुत्र्याला त्याने जंगलात नेले. हा प्रकार त्याच भागातील एका सुरक्षा रक्षकाने पाहिल्यानंतर मात्र त्याचे भंबेरी उडाली. याच कुत्र्यासोबत असलेली सात पिल्ले सुदैवाने सुरक्षित आहेत. आता हा बिबटया आणि त्या कुत्र्याचा शोध वनविभागामार्फत घेण्यात येत असल्याचे ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले. स्थानिकांची ही माहिती असली तरी हा बिबटया परिसरात आढळून आला नसल्याचे येऊरचे परिक्षेत्र वनअधिकारी राजेश पवार यांनी सांगितले.
धक्कादायक! ठाण्याच्या पातलीपाडयामध्ये बिबट्याने केली कुत्र्याची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2020 11:46 PM
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राणीगणना झाली नसली तरी येऊर आणि पातलीपाड्याच्या परिसरात बिबटयाचे हमखास दर्शन होत असल्याचे येथील रहिवाशी सांगतात. दोनच दिवसांपूर्वी पातलीपाडा भागात एका बिबट्याने एका भटक्या कुत्र्याची शिकार करुन त्याला जंगलात नेले.
ठळक मुद्देवनविभाग मात्र अनभिज्ञ स्थानिकाने दिली माहिती