लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : इंदिरानगर येथील साईबाबा मंदिरातील दानपेटी चोरणाºया पिंटू कचरु घुले (४०, रा. साठेनगर, वागळे इस्टेट, ठाणे) या चोरटयास दक्ष नागरिकामुळे रंगेहाथ पकडण्यात आले. त्याला वागळे इस्टेट पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.इंदिरानगर येथील एक रहिवाशी उल्हास पाटील हे आपल्या सातारा येथील गावी गेले होते. ते ६ एप्रिल रोजी पहाटे २.२० वाजण्याच्या सुमारास नितीन कंपनी येथे एका खासगी बसने उतरले. ते आंबेवाडी भाजीमार्केट जवळील पोलीस चौकीजवळून जात असतांना पिंटू हा आकाश बारच्या मागे असलेल्या आंबेवाडी भाजी मार्केटसमोरील इंदिरानगर येथील साईबाबा मंदिराची ग्रिलची खिडकी तोडून आत शिरकाव करुन दानपेटी उचलून ती चोरी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर त्याच भागातून गस्तीवर जात असलेल्या पोलीस उपनिरीक्षक निकुंभ यांच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. नंतर त्याच्याविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास अटक केली. पोलीस नाईक आर. सी. शेलार हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
धक्कादायक! साईबाबा मंदिरातील दानपेटी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्यास रंगेहाथ अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 12:58 AM
इंदिरानगर येथील साईबाबा मंदिरातील दानपेटी चोरणाºया पिंटू कचरु घुले (४०, रा. साठेनगर, वागळे इस्टेट, ठाणे) या चोरटयास दक्ष नागरिकामुळे रंगेहाथ पकडण्यात आले.
ठळक मुद्देदक्ष नागरिकामुळे चोरटयावर कारवाईवागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा