लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : गुजरात राज्यात मॉडेलींग करणाºया एका १९ वर्षीय तरुणावर ठाण्यातील एका बंद कंपनीच्या गच्चीवर चौघांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी सोमवारी पुनीत शुक्ला (२६) याला तर मंगळवारी रात्री रवी जयस्वाल (२३) आणि अरविंद प्रजापती (२३) अशा तिघांना अटक केली. त्यांच्या चौथ्या साथीदाराचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.या पिडित मॉडेल तरुणाचे काही नातेवाईक ठाण्यातील सावरकरनगर भागात वास्तव्याला आहेत. त्यांनाच भेटण्यासाठी तो ठाण्यात आला होता. ही माहिती त्याचा फेसबुकवरील मित्र पुनीत याला मिळाली. त्याने ३ जानेवारी रोजी रात्री पीडित तरु णाला भेटण्यासाठी साठे नगर येथील बंद पडलेल्या एका कंपनीजवळ बोलविले. तो तिथे आल्यानंतर गप्पा मारण्याच्या बहाण्याने त्याला या कंपनीच्या गच्चीवर नेले.त्या ठिकाणी काही वेळातच आणखी दोघेजण आले. त्यांनी या तरु णाला बांबूने मारहाण करून नंतर त्याच्यावर इतर तिघांनी अनैसर्गिक सामुहिक अत्याचार केला. हा सर्व प्रकार पुनीतने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करीत मारहाण केली. नंतर त्याच्याजवळील मोबाईल फोन आणि सहा हजारांची रोकड जबरीने हिसकावली. पोलिसांकडे तक्र ार केल्यास हा व्हिडिओ फेसवुकवर टाकण्याची धमकी देऊन चौघेही तिथून पसार झाले. या प्रकाराने भेदरलेल्या या तरुणाने दुसºया दिवशी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चार जणांविरुद्ध अनैसिर्गक सामूहिक अत्याचार, मारहाण करुन जबरीने चोरी केल्याचा गुन्हा दाखल झाला.*वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकुंभ आणि पोलीस हवालदार शिवाजी रावते यांच्या पथकाने सोमवरी पुनीतला श्रीनगर परिसरातून अटक केली. त्यापाठोपाठ त्याच्या दोन्ही साथीदारांना मंगळवारी अटक करण्यात आली. पुनीतला ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. आरोपींचे मोबाईल फोन तपासणीसाठी जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
धक्कादायक! गुजरातमध्ये मॉडेलिंग करणाऱ्या तरुणावर ठाण्यात लैंगिक अत्याचार : तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2021 11:09 PM
गुजरात राज्यात मॉडेलींग करणाºया एका १९ वर्षीय तरुणावर ठाण्यातील एका बंद कंपनीच्या गच्चीवर चौघांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी सोमवारी पुनीत शुक्ला (२६) याला तर मंगळवारी रात्री रवी जयस्वाल (२३) आणि अरविंद प्रजापती (२३) या तिघांना अटक केली.
ठळक मुद्देवागळे इस्टेट पोलिसांची कारवाईचौथ्या आरोपीचा शोध सुरु