लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मुंबई महापालिकेतील मल:निसारण विभागातील उपअभियंता गणेश विलास क्षीरसागर (४०, रा. दोस्ती कॉम्पलेक्स, ठाणे) यांचा मंगळवारी दुपारी ठाण्यातील घरात ह्दयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, सात वर्षांचा मुलगा आणि आई वडिल असा परिवार आहे.गणेश यांची पत्नी महाबळेश्वर येथील एका बँकेत उपव्यवस्थापक आहे. तर ठाणे महापालिकेचे ठेकेदार सहयाद्री कन्स्ट्रक्शनचे मालक विलास क्षीरसागर यांचे ते चिरंजीव होते. त्यांचा मुलगाही जवळच असलेल्या तारांगण सोसायटीतील आजोबांकडे वास्तव्याला होता. त्यामुळे घरी ते एकटेच होते. मुंबई महापालिकेत सध्या त्यांच्यावर कोरोनामुळे विशेष जबाबदारी सोपविण्यात आली होती. २६ मे रोजी दुपारी जेवणासाठी त्यांच्या वडिलांनी त्यांना फोन केला. वारंवार फोन करुनही त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने अखेर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास काही शेजाऱ्यांच्या मदतीने दररवाजा तोडून त्यांनी घरात प्रवेश केला. तेंव्हा बाथरुममध्येच डोक्याला मार लागल्याने ते रक्ताच्या थारोळयात पडल्याचे आढळले. मंगळवारी दुपारीच हह्दयविकाराने त्यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक अमोल जाधव याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
धक्कादायक! मुंबईतील अभियंत्याचा ठाण्यातील घरात ह्दयविकाराने मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 5:57 PM
लॉकडाऊनमुळे ठाण्यातील घरात एकटेच असलेल्या मुंबईतील अभियंत्याचा ह्दयविकाराने मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. घरात कोणीच नसल्यामुळे वडिलांनी जेवणासाठी त्यांना वारंवार फोन करुनही प्रतिसाद न दिल्यामुळे हा प्रकार समोर आला. अखेर दरवाजा तोडून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
ठळक मुद्दे वडिलांनी जेवणासाठी फोन केल्यानंतर उघड झाला प्रकारकोरोनासाठी होते आॅन डयूटी