शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

धक्कादायक! नोकरीवरुन काढण्याची धमकी देत विवाहितेवर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 9:38 PM

नोकरीवरुन काढण्याची धमकी देत तसेच लग्न करण्याचेही अमिष दाखवून एका ३४ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आशुतोष धुर्वे (४८, रा. नौपाडा, ठाणे) याच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देदहा वर्षांपासून सुरु होते अत्याचारलग्नाचेही दाखविले अमिष

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: नोकरीवरुन काढण्याची धमकी देत तसेच लग्न करण्याचेही अमिष दाखवून एका ३४ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आशुतोष धुर्वे (४८, रा. नौपाडा, ठाणे) याच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. या संबंधाची व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याचीही धमकी या कथित आरोपीने दिली होती.पिडित महिलेने नौपाडा पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार आशुतोष याने २०१० ते मार्च २०२१ या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये हा प्रकार केला. या काळात त्याने कल्याणच्या एका हॉटेलमध्ये, ठाण्यातील तीन हात नाका येथील त्यांच्या कार्यालयातील बेडरुममध्ये, ठाण्यातील लोढा कॉम्पलेक्समधील एका मित्राच्या फ्लॅटवर तसेच आशुतोष याच्या खारेगाव येथील इमारतीमधील एका सदनिकेत वारंवार नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी देत जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच तिला दिलेल्या पैशांची मागणी करीत त्यांच्या संबंधांची व्हिडिओ क्लिप प्रसारीत करण्याचीही धमकी देत हा प्रकार सुरु ठेवला. त्याचवेळी तिला पतीपासून घटस्फोट घेण्यासही भाग पाडले. स्वत:चा घटस्फोट झालेला नसतांनाही तिला लग्नाचे अमिष दाखवून जबरदस्तीने संबंध केले. तिने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर मात्र तू खालच्या जातीची आहे. आपण उच्च जातीचे असल्याचा दावा करीत आशुतोषने लग्नास नकार दिला. वारंवारच्या अत्याचाराला कंटाळून अखेर याप्रकरणी या महिलेने आरोपीविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात २३ जुलै २०२१ रोजी लैंगिक अत्याचार (३७६, ४१७, ५०६) सह अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे सहायक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र