लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : लॉकडाऊनमुळे एका चांगल्या खासगी कंपनीतील नोकरी गेली. त्यात मोठया आजारपणाला तोंड द्यावे लागत असल्यामुळे वैफल्यग्रस्त झाल्यामुळे देवेंद्र दत्ताराम कदम (४०, रा. महात्मा फुलेनगर, ठाणे) या सुरक्षा रक्षकाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. याप्रकरणी आकस्मिक मृत्युची नोंद वर्तकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे देवेंद्र याची एका चांगल्या कंपनीतील नोकरी अलिकडेच गेली. त्यात त्याने खासगी सुरक्षा रक्षक म्हणून एक ठिकाणी नोकरी पत्करली होती. परंतू, त्यात त्याला मोठया आर्थिक टंचाईला तोंड द्यावे लागत होते. यातच भर त्याच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्याची माहितीही त्याला रुग्णालयातून समजली होती. त्यामुळे तणावग्रस्त झाल्याने त्याने ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १२ वाजण्याच्या सुमारास घरातच कपडे वाळत घालण्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी त्याची पत्नी दिक्षा (३८) ही घरकामासाठी तर आठ वर्षीय मुलगा खेळण्यासाठी घराबाहेर पडला होता. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमोल जाधव हे अधिक तपास करीत आहेत.
धक्कादायक!आजारपणाला कंटाळून ठाण्यात सुरक्षा रक्षकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2020 12:44 AM
लॉकडाऊनमुळे एका चांगल्या खासगी कंपनीतील नोकरी गेली. त्यात मोठया आजारपणाला तोंड द्यावे लागत असल्यामुळे वैफल्यग्रस्त झाल्यामुळे देवेंद्र दत्ताराम कदम (४०, रा. महात्मा फुलेनगर, ठाणे) या सुरक्षा रक्षकाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
ठळक मुद्दे लॉकडाऊनमुळे नोकरीही गमावली