लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: राज्यभरात संचारबंदी लागू झाल्यानंतर शहापूर तालुक्यातील अल्याणी गावठाणपाडा येथील अमिना शेख (६५) या महिलेचा २६ ते २७ मार्च दरम्यान खून झाला होता. या प्रकरणाचा तपास आता ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी वर्ग केला आहे. किन्हवली पोलीसही या खूनाचा समांतर तपास करणार आहेत.अल्याणी गावठाणपाडा येथील बस थांब्याजवळील एका तात्पूरत्या चिकन विक्रीच्या दुकानामध्ये समीर शेख यांची आजी अमिना ही झोपली होती. तेंव्हा २६ मार्च रोजी रात्री ९.३० ते २७ मार्च रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने तिच्या डोक्यामध्ये हत्याराने वार करुन तिचा खून केला. याप्रकरणी २७ मार्च रोजी किन्हवली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. ती मुलगा शब्बीर, सून आणि दोन नातवंडासह वास्तव्याला होती. रोज रात्री गावाच्या नाक्यावर असलेल्या त्यांच्याच चिकनच्या दुकानाचे काही नुकसान होऊ नये म्हणून ती झोपण्यासाठी जात होती. सकाळी ती घरी परतत असायची. त्यादिवशी ती घरी न परतल्यामुळे हा प्रकार समोर आला. तिचा कोणी आणि कोणत्या कारणामुळे खून केला असावा, याबाबत अनेक तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. किन्हवली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र पालवे यांचे पथकही या प्रकरणाचा तपास करीत आहेत. आता हे प्रकरण ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्याकडे पोलीस अधीक्षक डॉ. राठोड यांनी बुधवारी समांतर तपासासाठी वर्ग केले आहे. गावात त्यादिवशी कोण कोण आले होते? चोरीच्या उद्देशाने हा प्रकार झाला का? अशा अनेक बाबी तपासण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
धक्कादायक! संचारबंदीमध्ये किन्हवलीत वृद्धेचा खून: ठाणे स्थानिक गुन्हे शाखा करणार तपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 8:12 PM
संचारबंदी लागू झाल्यानंतर शहापूर तालुक्यातील अल्याणी गावठाणपाडा येथील अमिना शेख (६५) या वृद्धेचा २६ ते २७ मार्च दरम्यान खून झाला होता. या खूनाचा तपास ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांचे आदेशऐन संचारबंदीमध्ये झाला होता खून