लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: कळव्याकडून खारेगावकडे जाणारा सह्याद्री सोसायटी समोरील रस्ता बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास खचल्याची बाब समोर आली. खचलेला रस्ता अंदाजे ३×३ फूट व २.५ फूट खोल असून उर्वरित रस्त्याचा भाग धोकादायक स्थितीमध्ये आल्याने त्या ठिकाणी धोकापट्टी लावून बॅरिकेटिंग करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
कळव्यात रस्ता खचल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व ड्रेनेज विभागाचे उप अभियंता व कनिष्ठ अभियंता, बांधकाम विभागाचे कर्मचारी, कळवा पोलीस यांनी धाव घेतली. तातडीने आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी धोकापट्टी लावून बॅरिकेटिंग केली. यावेळी, कोणतीही जीवितहानी झाली नसून कोणालाही दुखापत झालेली नाही. तर अंदाजे ३×३ फूट व २.५ फूट खोल इतकी रस्ता खचला असावा असा प्राथमिक अंदाज आपत्ती व्यवस्थापन कक्षाने व्यक्त आहे.