शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

धक्कादायक! ठाण्यात सिगारेटसाठी दोन पोलिसांसह तिघांनी केली विक्रेत्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 11:38 PM

ठाण्यातील कळवा भागात रविवारी मध्यरात्री मुंब्रा येथील दोन पोलिसांसह एका रिक्षा चालकाने सिगारेटच्या मागणीसाठी चक्क एका विक्रेत्या पिता पुत्राला मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली. अशा पोलीस किंवा नागरिकांविरुद्धही साथ प्रतिबंधक कायद्यातील कलम १८८ नुसार कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

ठळक मुद्देकळवा पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखलविक्रेत्या पिता पुत्राला मारहाणीबरोबर धमकीही दिलीपोलिसांनी साथ प्रतिबंधक कायद्यातील कलम लावलेच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: एकीकडे कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी कळवा आणि मुंब्रा भागात संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. त्यासाठी पोलीस आणि पालिका प्रशासनाकडूनही कठोर परिश्रम घेतले जात आहेत. तर दुसरीकडे मुंब्रा पोलीस ठाण्याच्या दोन पोलिसांसह तिघांनी कळव्यातील गांधीनगर येथील एका किराणा विक्रेत्याकडे सिगारेटची मागणी करण्यात आली. ती न दिल्याने बकुल परमार (३२) आणि अंकेश परमार (१२) या पिता पुत्राला मारहाण करुन बघून घेण्याची धमकी देण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.याप्रकरणी कुमार पुजारी (३२, रा. मुंब्रा), मंदार कांबळे या दोन पोलिसांसह विशाल बिराडे या रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थांची विक्रीसह दारुची दुकानेही सध्या बंद आहेत. अशी दुकाने उघडी ठेवणाऱ्यांवर पोलिसांकडून साथ प्रतिबंधक कायदा कलम १८८ नुसार कारवाई देखिल केली जात आहे. असे असूनही कळवा, गांधीनगर येथील राणा टॉवर भागातील बकुल या किराणा व्यापाºयाला पुजारी याच्यासह तिघांनी आपण पोलीस असून आम्हाला सिगारेट आणि तंबाखू दे, असे म्हणत त्याला दुकान उघडण्यास भाग पाडले. आमच्या दुकानात सिगारेट आणि तंबाखू नसल्याचे बकुल यांनी सांगितल्यानंतरही त्यांना तसेच त्यांचा मुलगा अंकेश याला या तिघांनी जबर मारहाण केली. हा प्रकार १२ एप्रिल रोजी रात्री ११.३० ते १२ वाजण्याच्या सुमारास घडला. कहर म्हणजे त्यांच्यापैकीच एकाने या दुकानातील काही रोकडही घेतल्याचा आरोप अंकेश यांनी केला आहे. रात्री कळवा पोलिसांना पाचारण करुन दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तर त्यांचा तिसरा साथीदार मात्र पसार झाला होता. त्यालाही नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात मारहाण करणे, शिवीगाळ करणे आणि धमकी दिल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुळात संचारबंदीच्या काळात सिगारेट विक्री करणाऱ्यांवर जर साथ रोग प्रतिबंधक कायदा लागू केला जात असेल तर सिगारेट मागण्यासाठी दुकान उघडण्यास भाग पाडणाºया पोलिसांविरुद्धही तीच कलमे लावली जावीत, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहेत. 

‘‘ या प्रकरणामध्ये मुंब्रा पोलीस ठाण्याचे पुजारी आणि कांबळे हे दोन पोलीस कर्मचारी आहेत. तर बिराडे हा रिक्षा चालक आहे. सिगारेट मागण्यावरुन विक्रेता आणि या तिघांमध्ये बाचाबाची झाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल असून सखोल चौकशी करण्यात येत आहे.’’विजय दरेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळवा पोलीस ठाणे 

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस