लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: नोकरीच्या नावाखाली तरु णींना बांग्लादेशातून मुंबई ठाण्यात आणून त्यांना जबरदस्तीने शरीरविक्रयाचा व्यवसाय करण्यास भाग पाडणा-या टोळीचा चितळसर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या तिघींचीही एका खोलीतून बांग्लादेशी तरु णींची सुटका करण्यात आली असून समीर हाजारी घोश (४२) याला अटक केल्याचे चितळसर पोलिसांनी बुधवारी सांगितले.आम्हाला ठाण्यातील एका इमारतीमध्ये डांबून ठेवण्यात आल्याची माहिती एका पिडीत तरुणीने मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला दिली. हीच माहिती मुंबई नियंत्रण कक्षाकडून ठाणे पोलिसांना देण्यात आली. हे ठिकाण चितळसर मानसरोवर येथील धर्मवीर नगर परिसरात असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली एका विशेष पथकाने धर्मवीर नगर येथील एका इमारतीत १० आॅक्टोबर रोजी छापा टाकून तिसºया मजल्यावरील एका खोलीत २० ते २५ वयोगटातील तीन तरु णींसह एका दलालास त्यांनी ताब्यात घेतले.आम्हाला रकी याने नोकरीचे अमिष दाखवून बांग्लादेश येथून जंगलाच्या आड वाटेने कोलकत्ता येथे आणले. त्याठिकाणी आमचे बोगस आधारकार्ड बनवून विमानाने मुंबईत आणले. मुंबईतून थेट ठाण्यातील एका इमारतीमधील खोलीत डांबून ठेवले. यात खोलीमध्ये त्याने शरीरविक्रयाच्या व्यवसायात ढकलून दिल्याची माहिती पिडित तरुणीेंनी चितळसर पोलिसांना चौकशीमध्ये दिली. पोलिसांनी या तिघींचीही सुटका केली आहे. या तिघींच्याही देखरेखीसाठी ठेवलेल्या समीर हाजारी घोश (४२) याला अटक करण्यात आली आहे. त्याला १७ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. तर रकी आणि गुलाम या त्याच्या इतर दोन साथीदारांविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
धक्कादायक! नोकरीच्या नावाखाली बांग्लादेशी तरुणींना लोटले शरीर विक्रयाच्या व्यवसासात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 9:22 PM
नोकरीचे अमिष दाखवित बांग्लादेशी तरुणींना शरीरविक्रयाचा व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या टोळीतील एकाला चितळसर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. या तिघींनाही एका खोलीत डांबून ठेवण्यात आले होते. आता या तिघींचीही ठाण्यातील चितळसर पोलिसांनी सुटका केली आहे.
ठळक मुद्देतिघींची ठाण्यातून सुटका चितळसर पोलिसांची कारवाई मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला दिली होती माहिती