ठाणे : जे नोंदणीकृत फेरीवाले स्टेशन परिसरात बसतात त्यांच्यावर कारवाई करू नये अशी मागणी स्फूर्ती फेरीवाल्यांच्या प्रतिनिधीनी सोमवारी झालेल्या पहिल्याच महापौर जनसंवाद या कार्यक्रमात केली. मात्र, यावर महापौर नरेश म्हस्के यांनी थेट आक्र मक पवित्रा ती मागणी फेटाळून लावली. स्टेशन परिसरात नागरिकांना चालण्यासाठी मोकळे रस्ते हवे, मोकळे फुटपाथ हवेत, त्या ठिकाणी नोंदणीकृत फेरीवाले असले तरी त्यांना बसू देऊ नये असे स्पष्ट आदेश त्यांनी यावेळी दिले. विशेष म्हणजे मार्केटमध्ये फेरीवाल्यांना दोन बाय दोनच्या जागेत बसण्यासाठी संबधित दुकानमालक २५ लाख रु पये घेत असल्याचा गंभीर आरोपदेखील महापौरांनी यावेळी केला. जे नोंदणीकृत फेरीवाले आहेत त्यांचे पुनर्वसन इतर ठिकाणी करावे अशी सूचना करून स्टेशन परिसरात एकही फेरीवाला बसणार नाही, याची दक्षता सहाय्यक आयुक्तांनी घ्यावी, असे आदेश दिले.जनसंवाद कार्यक्रमात यावेळी महापौरांनीच असा आरोप केल्याने फेरीवाल्यांवरील कारवाई बाबत आता प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच स्टेशन परिसरातील फेरीवाले हटणार का? हेदेखील याकडे लक्ष लागले आहे. दिव्यांगांना उद्योग करण्यासाठी महापालिकेची योजना आहे. मात्र, त्यासाठी आधी २ लाख रु पये त्यांना उभे करावे लागतात.परंतु, तेवढे पैसे ते उभे करू शकत नाही, असे दिव्यांग संघटनेचे शरद पवार यांनी सांगितले. त्यानंतर महापौरांनी यावर तोडगा काढून एखादी एजन्सी नेमून तिच्या माध्यमातून ही रक्कम दिव्यांगांसाठी देण्यात यावी अशी सूचना केली. त्यास प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. आदिवासी भागात तुंबणाऱ्या गटारांच्या संदर्भात प्रकाश कदम यांनी मुद्दा उपस्थित केला. यावर तत्काळ कारवाई करवी अशी आदेश दिले. येत्या चार दिवसांत हा प्रश्न निकाली निघेल असे अश्वासॅन यावेळी दिले. रस्ता रु ंदीकरण आणि पालिकेच्या इतर प्रकल्पामध्ये बाधित झालेले नागरिक अनेक महिन्यांपासून आपल्या हक्काच्या निवाºयासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करते होते. अशा काही नागरिकांनी जनसंवादामध्ये आपली समस्या मांडली. यावर संपूर्ण माहिती घेऊन १५ दिवसांत घरे उपलब्ध करून देण्याच्या महत्त्वाचे आदेश आदेश यावेळी महापौरांनी दिले.भार्इंदरपाड्याचा पाणीपुरवठा १५ दिवसांत सुरळीतसमीर सावंत यांच्या मागणीनुसार स्मशानभूमीत विद्युतदाहिनीमध्ये शव जाळणे मोफत करण्याचे आदेश महापौरांनी यावेळी दिले. भार्इंदरपाड्यातील लोढा स्प्लेंडोरा कॉम्प्लेक्समध्ये ३० हजारांपेक्षा अधिक नागरीवस्ती असून केवळ २० टक्के पाणीपुरवठा होतो. हायवे ओलांडण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतो, असे नागरिकांनी सांगितले. १५ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्याबरोबरच अंडरपास करता येईल का याची चाचपणी करण्याचे आदेश महापौरांनी दिले.
दुकानमालक फेरीवाल्यांकडून २५ लाख घेतात, महापौरांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 1:44 AM