अरुणकुमार मेहत्रे, कळंबोलीमाफक दरात आपणास हवी असणारी वस्तू मिळविण्याचा ग्राहकांचा कल असतो. अशा वस्तू कमी किमतीत अथवा सवलतीच्या दरात मिळत असल्याने गेल्या काही दिवसांपासून आॅनलाइन शॉपिंग करण्याला अधिक पसंती देण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत मंदीचे सावट असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. पनवेल परिसरात कित्येक मोबाइल दुकाने मिळकत नसल्याने बंद करावी लागली आहेत, तर काही दुकाने बंद होण्याच्या मार्गावर आहे. सुरुवातीला आॅनलाइन शॉपिंगबाबत सामान्यांमध्ये विश्वासार्हता नव्हती. दर्जेदार वस्तूची हमी नसल्याने आॅनलाइन खरेदी म्हणजे जुगाड मानले जायचे. मात्र हाच जुगाड सर्वसामान्यांच्या पसंतीस उतरला आहे. पनवेल, नवीन पनवेल येथील प्रत्येक कुरिअर कंपनीकडे दिवसाला मोठ्या संख्येने आॅनलाइन शॉपिंगचे पार्सल येत असतात. याशिवाय उत्पादनाबद्दल तक्र ारीसाठी किंवा वस्तू परत करण्याच्या सुविधेसाठी हेल्पलाइन क्रमांकही देण्यात येतो. तक्रार केल्यावर त्वरित सेवा मिळत असल्याचे नियमित आॅनलाइन खरेदी करणाऱ्या रुचीर कदम या युवकाने सांगितले. आॅनलाइन खरेदीमधून दिवसाला २५० ते ३00 पेक्षा जास्त पार्सल येत असून प्रामुख्याने मोबाइल्स अधिक असल्याचे एका कुरिअर प्रतिनिधीने सांगितले. पूर्वी दिवसाला किमान पाच ते सहा मोबाइलची विक्र ी होत असे. आता एक मोबाइल सुध्दा विक्रीस जात नसल्याचे मोबाइल शॉपीचे मालक दिनेश गावडे यांनी सांगितले.
दुकानदारांना आॅनलाइन खरेदीचा फटका
By admin | Published: April 19, 2016 2:02 AM