शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

गौणखनिज वसुलीमध्ये सावळा गोंधळ

By admin | Published: June 30, 2017 2:45 AM

भिवंडी तहसील कार्यालयात गौणखनिज वसुलीत सावळागोंधळ सुरू आहे. गौणखनिज दक्षता पथकाने विनारॉयल्टी रेतीची वाहतूक करणारे

लोकमत न्यूज नेटवर्कअनगाव : भिवंडी तहसील कार्यालयात गौणखनिज वसुलीत सावळागोंधळ सुरू आहे. गौणखनिज दक्षता पथकाने विनारॉयल्टी रेतीची वाहतूक करणारे ट्रक उपविभागीय अधिकाऱ्यांच्या लेखी आदेशाशिवाय सोडण्यात येत आहेत. संबंधित दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.रेतीच्या चोरट्या वाहतुकीला आळा बसण्यासाठी तहसील कार्यालयाच्या गौणखनिज दक्षता पथकामार्फत तपासणी करण्यात येते. मंडळ अधिकारी, तलाठ्यांनी विनारॉयल्टी पकडलेले रेतीचे ट्रक तहसील कार्यालयात जमा करतात. त्याप्रमाणे दोन ट्रक १८ व १९ जून रोजी दक्षता पथकाने पकडून तहसील कार्यालयात जमा केलेल्या ट्रकचे गौणखनिजपोटी वसूल केलेली रक्कम यात तफावत आहे. संबंधित रेतीमालकांनी दंड न भरता व जमा केलेले ट्रक उपविभागीय अधिकाऱ्यांचा लेखी आदेश आल्याशिवाय सोडण्यात येत नाही, असा कायदा आहे. मात्र त्याला बगल देत भिवंडी तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दोन्ही ट्रक सोडले आहेत. तहसीलदार शशिकांत गायकवाड तीन दिवस पुण्याला प्रशिक्षणला गेले असताना हा प्रकार घडला. विनारॉयल्टी रेतीचा ट्रक सोडणारे निवासी नायब तहसीलदार संदीप आवारी यांची या प्रकरणी चौकशी करून त्यांच्यासह रेतीमाफियांवर कारवाई करावी अशी मागणी आदिवासी महादेव कोळी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मनीष भोईर यांनी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यामुळे तहसील कार्यालयात सुरू असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मनमानीला आळा बसेल अशी चर्चा सुरू आहे.