सुुरेश लोखंडे।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच आहे. यामुळे ग्रामीण भागांत विंचू, सर्पदंशाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांचा अभाव असण्यासह औषधांचा तुटवडा असल्याचा अनुभव वज्रेश्वरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषद सदस्य कैलास जाधव यांनी घेतल्याचे सांगितले.शहापूर, मुरबाड आदी तालुक्यांमधील केंद्रांमध्येही औषधांचा अभाव असल्याचे जिल्हा परिषद सदस्य सांगत आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणल्यास नाइलाज असल्याचे ते सांगत असल्याचे जाधव यांनी सांगितले. भिवंडी तालुक्यातील झिडके येथील सरपंच शंकर जाधव यांना सर्पदंश झाला असता त्यांना उपचारासाठी या वज्रेश्वरी आरोग्यकेंद्रात नेले होते. मात्र, तेथे डॉक्टर नव्हते, तसेच रुग्णाला हलवण्यासाठी रुग्ण्वाहिकेचा चालकही नसल्यामुळे या रुग्णास उपचारापासून वंचित राहावे लागल्याचे जाधव यांनी सांगितले.याप्रमाणेच या आरोग्य केंद्रात वेढेगाव येथील रवींद्र मुकणे, सर्पदंशावर काही दिवसांपासून उपचार घेत आहेत. विंचू चावलेल्या दिघाशी येथील वनीता मराठे, सर्पदंश झालेल्या रिया पाटील यांच्यावर वज्रेश्वरी आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. पण, त्यांना सर्प व विंचूदंश दूर करण्याचा औषधीचा डोस न मिळाल्यामुळे पडून होत्या. या सर्व रुग्णांना अन्यत्र म्हणजे भिवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न जाधव यांनी केला. पण, आरोग्य केंद्रात चालक नसल्यामुळे व गाडीही नादुरुस्त असल्यामुळे या रुग्णांना अन्यत्र हलवता आले नसल्याचे त्यांनी निदर्शनात आणून दिले. तर, मुरबाड येथील जिल्हा परिषद सदस्य सुभाष घरत यांनीदेखील जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेहमीच डॉक्टरांचा अभाव असून औषधीसाठाही पुरेसा नसल्याचे निदर्शनात आणून दिले.पालकमंत्र्यांचे आदेशही बसवले धाब्यावरजिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील अत्यावश्यक सर्प, विंचूदंशावरील उपाययोजनेच्या औषधीचा साठा उपलब्ध नसल्याचे घरत व जाधव यांनी सांगितले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी हिरालाल सोनवणे यांनी मान्सूनपूर्व उपाययोजना आढावा बैठकीत आरोग्य अधिकाºयांना औषधीसाठा पुरेशा प्रमाणात ठेवण्याचे आदेश दिलेले आहे. एवढेच नव्हे तर राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्रातील योजनांचा आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनीदेखील जिल्हा आरोग्य अधिकाºयांना सतर्कतेचा इशारा देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना आरोग्यसेवा सुरळीत देण्याचे आदेश जारी केले आहे. पण, खुद्द जिल्हा परिषद सदस्यांनीच आरोग्य केंद्रातील प्रत्यक्ष अनुभवावरून औषधीसाठा व डॉक्टरांचा अभाव असल्याचे लोकमतच्या निदर्शनात आणून दिले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांत सर्पदंश औषधांचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 11:51 PM