शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
2
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
4
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
6
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
7
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
8
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
9
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
10
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
11
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
12
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
13
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
14
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
15
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
17
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
18
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
19
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
20
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया

श्रद्धा लाड मृत्यू प्रकरण; ती अन आत्महत्या; करूच शकत नाही! : मैत्रीणींचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 3:02 AM

पाचपाखाडीतील मानसोपचार तज्ज्ञ आणि स्कूल नर्सरीच्या संचालिका श्रद्धा लाड यांच्या हत्येचे कारण २४ तासांनंतरही स्पष्ट झाले नाही. परंतू, त्या आत्महत्या करतील याच्यावर त्यांच्या नातेवाईकांसह मैत्रिणींना विश्वास बसलेला नाही.

ठाणे : पाचपाखाडीतील मानसोपचार तज्ज्ञ आणि स्कूल नर्सरीच्या संचालिका श्रद्धा लाड यांच्या हत्येचे कारण २४ तासांनंतरही स्पष्ट झाले नाही. परंतू, त्या आत्महत्या करतील याच्यावर त्यांच्या नातेवाईकांसह मैत्रिणींना विश्वास बसलेला नाही. आत्महत्येपूर्वी त्यांनी काहीही लिहून ठेवले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.मूळ साताºयातील कोरेगाव येथे राहणाºया श्रद्धा (४२) यांचा १९९७ साली दिलीप लाड (५०) यांच्याशी विवाह झाला. दिलीपही मूळ पाटणचे असून, लग्नानंतर काही वर्षांपासून ते ठाण्यातील पांचपाखाडी येथे वास्तव्यास आहेत. त्याच परिसरात दिलीप यांचा भाऊ राहतो. दिलीप हे २०१३ मध्ये कामानिमित्त अमेरिकेला गेले होते. तसेच पुन्हा: ते गणपतीनंतर कामानिमित्त दुबईला काही वर्षांसाठी जाणार होते. पतीच्या दुबईला जाण्यालाही त्यांचा विरोध नव्हता. लाड दाम्पत्याला दोन मुले असून, श्रद्धा या मानसोपचार तज्ज्ञ आहेत. तसेच १२ वर्षांपासून त्या लहान मुलांची नर्सरी चालवत होत्या. श्रद्धा यांनी त्यांच्या भावजईला साताºयात नर्सरी सुरू करून दिली होती.काही दिवसांपासून श्रद्धा यांना ताप येत असल्याने त्या यंदा गावी गणपतीला गेल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांच्यासोबत दोन मुले आणि दिलीप यांच्या चुलतभावाची मुलगी घरी होती. शनिवारी दुपारी श्रद्धा या आपल्या रुममध्ये आराम करण्यासाठी जात असल्याचे सांगून आत गेल्या. सायंकाळी त्यांच्याकडे घरकाम करणारी बाई आल्यावर त्यांच्या पुतणीने त्यांना आवाज दिला. मात्र, त्यांच्या आवाजाला प्रतिसाद येत नसल्याने त्यांनी दरवाजाला धक्का दिल्यावर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले.श्रद्धा यांनी आजारी असल्याने गावावरून आईला बोलविले होते. मात्र, गणपती झाल्यानंतर येते असे आईने त्यांना सांगितले होते. श्रद्धा यांचे सासरी आणि माहेरी चांगले संबंध होते. नेहमीच हसमुख आणि मनमिळावू असणाºया श्रद्धा या नेहमीच प्रत्येकाची समजू काढत. ती आत्महत्या करेल यावर विश्वास बसत नाही. असे त्यांच्या नातेवाईक - त्यांच्यासोबत काम करणाºया तसेच त्यांच्या काही मैत्रिणींनी पोलिसांना सांगितले. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद नौपाडा पोलीस ठाण्यात केली असून, शवविच्छेदनाच्या अहवालात श्रद्धा लाड यांनी आत्महत्या केल्याचे नमूद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक हणमंत ओऊळकर करीत आहेत.