ठाणे : दिवा परिसरात मागील दोन महिन्यांपासून रस्त्यांची कामे संथगतीने सुरू असून ती कामे नियमानुसार होत नसल्याने त्या गैरकारभाराविरुद्ध येत्या १८ जानेवारीला भाजपा श्राद्ध घालून निषेध नोंदवणार आहे.दिवा परिसरात रस्त्यांची अवस्था बिकट आहे. रस्ते मंजूर होऊनही काम धीम्या गतीने सुरू असल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही कामे सुरू होऊन आता दोन महिने झाले तरी अद्यापही गटारांची कामे पूर्ण झालेली नाही. याकडे, प्रशासन आणि सत्ताधाºयांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप भाजपा दिवा-शीळ मंडळाचे सरचिटणीस रोहिदास मुंडे यांनी केला आहे. चुकीच्या पद्धतीने होत असलेली कामे रोखण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी वेळीच पाऊल उचलावे, अशी मागणी मुंडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
ठाणे दिव्यातील रस्त्यातील गैरकारभाराच्या निषेधार्थ भाजपा घालणार गुरूवारी श्राद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 5:25 PM
ठाणे : दिवा परिसरात मागील दोन महिन्यांपासून रस्त्यांची कामे संथगतीने सुरू असून ती कामे नियमानुसार होत नसल्याने त्या गैरकारभाराविरुद्ध येत्या १८ जानेवारीला भाजपा श्राद्ध घालून निषेध नोंदवणार आहे.दिवा परिसरात रस्त्यांची अवस्था बिकट आहे. रस्ते मंजूर होऊनही काम धीम्या गतीने सुरू असल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही कामे ...
ठळक मुद्देदोन महिन्यांपासून रस्त्यांची कामे संथगतीने सुरूवेळीच पाऊल उचलावे, अशी मागणी