ठाणे : ठाण्यात अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या वतीने ‘श्रावणरंग’ हे निमंत्रित कवींचे कविसंमेलन २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० वा. हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे आयोजित करण्यात आले आहे. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के हे या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, तर प्रसिद्ध गजलकार ए.के.शेख हे या काव्यमैफलीच्या अध्यक्षस्थानी राहणार असून, कवी, गझलकर संदीप माळवी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत राहतील.
या कवी संमेलनामध्ये कवी दुर्गेश सोनार, गीतेश शिंदे, प्रथमेश पाठक, संकेत म्हात्रे, आदित्य दवणे, निकिता भागवत, विजयराज बोधनकर, रामदास खरे, जितेंद्र लाड आणि वृषाली विनायक हे निमंत्रित कवी आपली कविता सादर करणार आहेत. कोरोनाच्या या वातावरणानंतर पहिल्यांदाच रसिकांना एक सुंदर काव्य मेजवानी मिळणार असून, रसिकांनी या काव्य संमेलनाला उपस्थित राहून आनंद घेण्याचे आवाहन अखिल भारतीय साहित्य परिषद महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ.बळीराम गायकवाड आणि सचिव डॉ.नरेंद्र पाठक यांनी केले आहे.