उल्हासनगर : शहरातील सफायर ब्लेंकेट हॉल मध्ये आयोजित केलेल्या महायुतीच्या संवाद यात्रेत खा. श्रीकांत शिंदे यांनी शहर विकासाचा पाडा वाचून दाखविला. संवाद यात्रेत रवींद्र चव्हाण, आमदार कुमार आयलानी, आनंद परांजपे यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित होते.
उल्हासनगरात गेल्या १० वर्षात मोठ्या प्रमाणात कामे झाली असून भुयारी गटार योजना, सिमेंट काँक्रिटचे रस्ते, कॅशलेस हॉस्पिटल, कामगार हॉस्पिटल अशा अनेक सुविधा आत्तापर्यंत पुरवल्या असल्याची माहिती आयोजित केलेल्या संवाद मेळाव्यात खा. श्रीकांत शिंदे यांनी दिली. शहरातील अनधिकृत इमारतींचे नियमितीकरण आणि पुनर्विकास यासाठी नियम बदलून राज्य सरकारने आणलेले धोरण हा सर्वात महत्त्वाचा निर्णय महायुती सरकारने उल्हासनगरसाठी घेतला. असे शिंदे म्हणाले. महायुतीतील प्रत्येक घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी २० मे रोजी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले.
महायुतीच्या संवाद यात्रेत सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, आमदार कुमार आयलानी, गोपाळ लांडगे, अजित पवार गटाचे प्रमोद हिंदुराव, साई पार्टीचे जीवन इदनानी, जगन्नाथ शिंदे, भारत गंगोत्री, भाजपाचे प्रदीप रामचंदानी, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव, शिंदेंसेनेचे किरण सोनावणे, अरुण आशान, दिलीप गायकवाड, राजेंद्र चौधरी, राजेंद्रसिंह भुल्लर, रमेश चव्हाण आदीजन उपस्थित होते.