ठाणे : मलेशिया येथे १३ ते १४ आॅक्टोबर रोजी झालेल्या इंटरनॅशनल मास्टर्स अॅथलेटिक्स स्पर्धेत ठाणे शहर पोलीस दलाच्या गुप्त वार्ताविभागातील श्रृतिका महाडिक-राजपूत यांनी वेगवेगळ्या तीन प्रकारात पदकांची कमाई केली आहे. यामध्ये एका सुवर्णपदकासह रौप्य आणि कांस्यपदकाचा ही समावेश आहे.श्रृतिका ह्या ठाणे जिल्हा मास्टर्स अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी उंच उडी गटात त्यांनी सुवर्णपदक पटकावले. तर, १०० मी धावण्याच्या शर्यतीत रौप्य तसेच तिहेरी उडी गटात कांस्यपदकांवर त्यांना समाधान मानावे लागले. त्यांचा अॅथलेटिक्सचा सराव सोंडकर आणि शामल घोष यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तसेच असोसिएशनचे अध्यक्ष जेराल्ड आणि सेक्रेटरी बाळा चव्हाण यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाण्याच्या श्रृतिका महाडिक यांना मलेशियात तीन पदके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 8:07 PM
ठाणे : मलेशिया येथे १३ ते १४ आॅक्टोबर रोजी झालेल्या इंटरनॅशनल मास्टर्स अॅथलेटिक्स स्पर्धेत ठाणे शहर पोलीस दलाच्या गुप्त ...
ठळक मुद्देइंटरनॅशनल मास्टर्स अॅथलेटिक्स