ठाणे - सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्येमुळे हा विषय वर आला आहे. त्यातून असे प्रकार घडत असतील तर वेळीच जागे व्हा, असे काही कोणाच्या निदर्शनास आले तर मनसेच्या वतीने त्याला प्रेक्षक म्हणून चित्रपट न पाहणे हा दणका बसू शकतो, किंवा चित्रपट होऊच न देणे हा सुध्दा दणका बसू शकतो, त्यामुळे सावध व्हा,असे प्रकार बंद करा असा धमकी वजा इशारा मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी दिला.
सुशांत सिंग राजपुतने केलेली आत्महत्या ही अंत्यत वाईट आणि दुर्देवी घटना आहे. एखाद्या मोठय़ा कलाकाराने अशा प्रकारे आत्महत्या करुन शेवट करणो हे योग्य नाही. नेकोटीझमच्या बाबतीत बोलायचे झाले तर, बॉलीवुड मोठय़ा प्रमाणात आहे की काय, असे दिसून येत आहे. नेमकी माहिती असल्याशिवाय यावर बोलणो योग्य नाही. परंतु निश्चितपणो असे ग्रुप हे असतात. परंतु यातून कोणाला तरी खाली पाडण्याचा हेतू अजिबात असू नये असे मत यावेळी अभिजित पानसे यांनी व्यक्त केले. मराठी चित्रपट सृष्टीबाबत बोलायचे झाल्यास येथे नेकोटीझम हा शब्द वापरणो योग्य होणार नाही. मराठी इंडस्ट्रीमध्ये सलोख्याचे वातावरण असते. काही जण, असा आरोप करतात की ग्रुपझीम आहे, परंतु त्याची दुसरी बाजूही समजून घेतली पाहिजे. आयुष्यात काही जण आपल्याबरोबर चांगले वागत असतील तर त्यांना संधी देणो काही गैर नाही. काही कलाकार उत्तम काम करतात, ते सतत प्रोजेक्टमध्ये काम करतात, म्हणून त्याला नेकोटीझम म्हणने अयोग्य आहे. हिंदी असे घडले असेल ते अतिशय दुर्देवी आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये तसे काही दिसून येत नाही. कलाकाराला व्यक्त होण्यासाठी त्याची मुस्कटदाबी करत असाल तर ते निश्चितच चुकीचे आहे. कलाकाराचे खरे प्रेम हे पैसा, प्रसिध्द यापेक्षा त्याच्या कलेवर असते. त्यामुळे त्याची ही गोष्ट जर बाहेर काढू दिली नाही तर त्याचा विस्फोट हा होतोच असेही त्यांनी सांगितले.
त्यात आता कोवीडच्या पार्श्वभूमीनंतर परिस्थिती फार गंभीर आहे, इंडस्ट्री कधी सुरु होईल, शुटींग कधी सुरु होईल, सिनेमा रिलीज होईल का नाही?, नाटकाचे काम सुरु आहे. चित्रपटाचे काम सुरु आहे. वेबसीरीजचे काम सुरु होते, त्यामुळे चिंता वाटत राहते हे केव्हा सुरु होणार, त्यामुळे ज्यांचे पोट याच्यावर त्यांचे निश्चितच यामुळे खुप नुकसान होत आहे. मी हात जोडून विनंती करतो की जेव्हा असा काही विचार डोक्यात आला तर, त्यावेळेस आपल्या पेक्षा खाली जे लोक असतात, त्यांच्याकडे बघत जा, किंवा जेव्हा यश येते तेव्हा आपल्यापेक्षा मोठय़ा लोकांकडे बघत जा असा सल्लाही त्यांनी दिला. सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येमुळे हा विषय वर आला आहे. त्यातून असे प्रकार घडत असतील तर वेळीच जागे व्हा, असे काही कोणाच्या निदर्शनास आले तर मनसेच्या वतीने त्याला प्रेक्षक म्हणून चित्रपट न पाहणे हा दणका बसू शकतो, किंवा चित्रपट होऊच न देणो हा सुध्दा दणका बसू शकतो, त्यामुळे सावध व्हा. असे प्रकार बंद करा असा धमकी वजा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
अन्य महत्वाच्या बातम्या...
पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना
Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली
रक्षक बनले भक्षक! गुंगीचे औषध देऊन पोलिसाने केला अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार
बँकेला चुना लावणाऱ्यांविरोधात CBIनं दाखल केला गुन्हा; मुंबईतील २ खासगी कंपन्यांचाही समावेश
भाजपा नेत्या, TIKTOK स्टार सोनाली फोगाट यांना अटक
एकटीच टीव्ही बघत होती चिमुकली, संधीचा फायदा घेत नराधमाने घरात घुसून केले शोषण