शहरं
Join us  
Trending Stories
1
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
2
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
3
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
4
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
5
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
6
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
7
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
8
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान
9
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
10
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: काँग्रेसचे 'खटाखट-खटाखट' मॉडेल फेल: अनुराग ठाकूर
11
'आजच बारामतीचा उमेदवार जाहीर करा'; अजित पवार म्हणाले, "तुमच्या मनातील..."
12
"कुठे आम्ही ६० जागा जिंकण्याच्या बाता मारत होतो आणि…’’, निकालांबाबत कुमारी शैलजा म्हणाल्या
13
जम्मू-काश्मीरच्या 'या' सात जागांवर काँग्रेस आणि एनसीत मैत्रीपूर्ण लढत; जाणून घ्या निकाल...
14
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
15
"मल्लिकार्जुन खर्गेजी पत्ता सांगा, 'ती' जिलेबी...", भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्र्याचा राहुल गांधींना बोचरा टोला
16
नवी मुंबईत महायुतीला झटका, शिंदेसेनेत बंडखोरी होणार, विजय नाहटा तुतारी हातात घेणार
17
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."
18
हरियाणा निकालाचे पडसाद महाराष्ट्रात; उद्धव ठाकरे आक्रमक, "CM पदाचा चेहरा.."
19
Explainer: हरयाणाच्या निकालाने वाढवलं महाविकास आघाडीचं 'टेन्शन'; चार मुद्दे इथेही पडू शकतात भारी!
20
Haryana Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 : हरियाणा-जम्मू काश्मीरमध्ये भाजपनं किती मुस्लिमांना दिलं होतं तिकीट? किती जिंकले?

घोडबंदर परिसरात बिबट्याचे दर्शन 

By धीरज परब | Published: August 29, 2022 11:17 PM

घोडबंदर गावालगतच वन हद्द असून ह्या भागातील वन हद्दीत तसेच लगतच्या प्रतिबंधात्मक क्षेत्रात अनेक बेकायदा बांधकामे व अतिक्रमण झालेली आहेत.

मीरारोड ( ठाणे ) - संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या घोडबंदर गावात सार्वजनिक शौचालय जवळ सोमवारी  पहाटे बिबट्याचे दर्शन घडल्याने परिसरात काहीसे भीतीचे वातावरण आहे . तसे पाहता ह्या भागात बिबट्यांचा वावर नवीन नसला तरी वन विभागाने लोकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 

घोडबंदर गावालगतच वन हद्द असून ह्या भागातील वन हद्दीत तसेच लगतच्या प्रतिबंधात्मक क्षेत्रात अनेक बेकायदा बांधकामे व अतिक्रमण झालेली आहेत. घोडबंदर गाव व घोडबंदर किल्ला परिसरात बिबट्यांचा वावर नवीन नाही. अनेकवेळा बिबट्या, बिबट्याची पिल्ले दिसून आली आहेत.  

सोमवारी पहाटे घोडबंदरच्या बामणदेव मंदिराजवळ असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर बिबट्या दिसून आला . त्यावेळी तेथे असलेल्या परिवहन सेवेतील बस वाहकाला बिबट्याचे दर्शन झाले असता त्याने चित्रीकरण केले. सदर सार्वजनिक शौचालयाचा वापर परिसरातील रहिवाशी पहाटेपासून रात्रीपर्यंत करत असतात. बिबट्या मोठा असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

सदर बिबट्या हा पूर्णवाढ झालेला असून नर असावा, असा अंदाज वन अधिकारी मनोज पाटील यांनी व्यक्त केला. वन विभागामार्फत परिसरातील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला असून जनजागृती केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वीदेखील परिसरात बिबट्या दिसून आला होता असे ते म्हणाले. 

टॅग्स :leopardबिबट्याmira roadमीरा रोडforest departmentवनविभाग