उरण :
आशिया उपखंडातील पाकिस्तान, भारत, नेपाळ व बांगलादेश या देशात आढळणाऱ्या गोल्डन जॅकल रविवारी (१६) पक्षी निरीक्षकाच्या दृष्टीस पडल्याने प्राणी मित्रांमध्ये उत्साहित झाले आहेत.उरणातीलच पाणजे पाणथळ परिसरात रविवारी पक्षी निरीक्षकांच्या हा गोल्डन जॅकल दृष्टीस पडला. निरिक्षकांना प्रथम अन्नाच्या शोधार्थ भटके कुत्रे असावे असेच वाटले.मात्र निरखून पाहिल्यावर हा तर गोल्डन जॅकलच असल्याची खात्री पटली.परिसरात गोल्डन जॅकलचे दर्शन झाल्याने प्राणी मित्रांचा आनंद व्दिगुणित झाला असल्याची प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमी पराग घरत यांनी दिली आहे.उरणमध्ये या आधीही जेएनपीटी कामगार वसाहत परिसर,डोंगरी,पाणजे येथील खारफुटीच्या जंगल परिसरात वाटसरुंना गोल्डन जॅकल पाहणीत आले असल्याची माहिती पक्षीप्रेमी आशिष घरत यांनी दिली.तर याच परिसरात कामावर ये-जा करताना काही वेळा गोल्डन जॅकल नजरेत पडत असल्याची माहिती प्राणी प्रेमी जगदीश तांडेल यांनी दिली.