शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

सिग्नल शाळेचे विद्यार्थी बनले आरटीओचे सदिच्छादूत, पोलिसी गणवेशात करणार जनजागृती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 1:58 AM

महाराष्ट्रातील परिवहन विभागातील प्रादेशिक कार्यालय ठाणे आणि रोटरी क्लब आॅफ ठाणे सनराइज यांच्या संयुक्त विद्यमाने रस्तासुरक्षा अभियानांतर्गत विविध उपक्र म घेतले आहेत.

ठाणे : तीनहातनाका सिग्नलवर भिक्षेकरी म्हणून जीवन जगणारी मुले सिग्नल शाळेमुळे शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आली. आता ही मुले याच सिग्नलवर आरटीओचे सदिच्छादूत म्हणून वाहनधारकांमध्ये रस्तासुरक्षा नियमांबद्दल जनजागृती करणार आहेत. या मुलांना आरटीओ त्यासाठी पोलिसांसारखा विशेष गणवेशही देणार आहे. रविवारी सकाळी ७ वाजता एका कार्यक्र मात त्यांना गणवेश देऊन रस्तासुरक्षा अभियानाचे सदिच्छादूत म्हणून जबाबदारी देण्यात येणार आहे.महाराष्ट्रातील परिवहन विभागातील प्रादेशिक कार्यालय ठाणे आणि रोटरी क्लब आॅफ ठाणे सनराइज यांच्या संयुक्त विद्यमाने रस्तासुरक्षा अभियानांतर्गत विविध उपक्र म घेतले आहेत. ठिकठिकाणी बॅनर्स, प्लेकार्ड लावले जातात. अनेकवेळा रस्ता सुरक्षा अभियान केवळ औपचारिकता म्हणून होते. ही कमतरता दूर करण्यासाठी ठाणे आरटीओ आणि रोटरी क्लब आॅफ ठाणे सनराइज यांनी मिळून एक कल्पक योजना आखली. त्यानुसार, हे दोघे मिळून वाहनचालक, पादचाऱ्यांना रस्तासुरक्षा नियम पाळण्याबाबत शुभेच्छापत्रवाटप करणार आहेत. या शुभेच्छापत्रात वाहतूक प्रसंगानुरूप चित्रे जी विनोदी, भावनिक असतील, तसेच दुस-या बाजूस रस्तासुरक्षा नियम दिले आहेत.हा उपक्र म ठाणे-मुंबईला जोडणा-या तीनहातनाका सिग्नल येथे दरमंगळवारी सकाळी ९ वाजता होणार आहे. याचा शुभारंभ रविवारी सकाळी ७ वाजता वॉकेथॉनच्या माध्यमातून ठाणे, लुईसवाडी आरटीओ येथून होईल. आरटीओ अधिकारी अपर्णा पाटने याबाबत म्हणाल्या की, या विद्यार्थ्यांची निवड करण्यामागचे कारण हे आहे की, विद्यार्थी सिग्नलजवळ राहतात. त्यांची शाळासुद्धा सिग्नलजवळ आहे. रस्तासुरक्षेचे उल्लंघन होताना ते नेहमी बघतात. सततच्या हॉर्नच्या आवाजामुळे या विद्यार्थ्यांना अभ्यासात व्यत्यय येत असतो. जेव्हा हे विद्यार्थी हॉर्न वाजवू नका, आमच्या अभ्यासात व्यत्यय आणू नका, असे लोकांना वारंवार सांगतील, तेव्हा आम्हाला खात्री आहे, की शुभेच्छा घेणारे नागरिक एक न् एक दिवस सिग्नल स्कूलच्या जागेवर आल्यावर आपसूकच हॉर्न वाजवणे थांबवतील. रस्तासुरक्षेचे नियम हे वर्तणुकीमध्ये उतरावयाचे आहेत. उपक्रमाच्या सातत्यामुळे हा परिणाम साधता येईल, असा विश्वास त्यांना आहे.मुलांना पोलिसी गणवेशाचे अप्रूप! : रस्तासुरक्षा अभियानासाठी ठाणे, तीनहातनाका येथील सिग्नल स्कूल विद्यार्थ्यांची सदिच्छादूत म्हणून निवड केली आहे. सिग्नल शाळेच्या मुलांना पोलिसी गणवेशाचे नेहमीच अप्रूप राहिले आहे. अनेक मुलांना पोलीस होण्याचे स्वप्न आहे. या उपक्र मामुळे त्यांच्यात आत्मविश्वास जागृत होईल. त्याबरोबर रस्तासुरक्षेच्या अभियानातही त्यांना हातभार लावता येईल, अशी अपेक्षा सिग्नल शाळेच्या प्रकल्पप्रमुख आरती परब यांनी व्यक्त केली.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसSchoolशाळाStudentविद्यार्थीthaneठाणे