कल्याण- विठ्ठलवाडी-कल्याण दरम्यान अप मार्गावर सिग्नलमध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाला होता. हा बिघाड दुरूस्त झाला असून मध्य रेल्वे हळूहळू पूर्वपदावर येते आहे. आर्ध्या तासापासून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. दोन्ही दिशेच्या रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झाला. कल्याण-बदलापूर दरम्यान दोन्ही मार्ग बंद झाले होते. सर्व लोकल अनिश्चित काळासाठी विलंबाने आहेत. तर एक्सप्रेस गाड्या कल्याण स्टेशनवर खोळंबल्या .ठाकुर्ली-कल्याण दरम्यानही गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. या गाड्या हळूहळू त्यांच्या गंतव्य स्थानावर रवाना होत आहेत.
विठ्ठलवाडी ते कल्याण अप मार्ग बंद असल्याने रिक्षा चालकांनी प्रवाशांची लुबाडणूक करण्यास सुरुवात केली. एरवी या अंतरासाठी 15 -20 रुपये आकारले जात होते, सद्य स्थितीत 80 ते 100 रुपये आकारण्यात येत आहे.