ठाणे : दिवंगत जमील शेख हत्या प्रकरणांतील प्रमुख आरोपी आणि सूत्रधार यांना तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करण्यांत यावी. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, शासकीय विश्रांती गृहाजवळ मंगळवारी " मूक धरणे " आंदोलन करण्यात आले.
जमील शेख हत्याप्रकरणी अखेर एका आरोपीस अटक
जमील शेख यांची हत्या करणाऱ्या खऱ्या सुत्रधाराला पकडा अशी मागणी मनसे उपाध्यक्ष जावेद शेख यांनी केली. जमिल रोज माझ्याकडे वृंदावन ते माजीवडा या मार्गावरून येत होते.वैयक्तिक दुष्मनी असती तर तिथेच मारले असते. भर बाजारात मारण्याचे करण एकच होते की राबोडित दहशत निर्माण करणे ज्यात ते यशस्वी झाले. राबोडित दहशत निर्माण करण्यासाठी जमिलची हत्या झाल्याचा आटोप जावेद शेख यांनी केला आहे. जमिलचा खून हा क्लस्टर विरोधातून झाला आहे. यात पालिकेच्या अधिकाऱ्यांचेही चौकशी व्हावी, या हत्येचे षडयंत्र राबोडित घडले , मुख्य सूत्रधार ही राबोडितुन होते असा आरोप मनसेठाणे पालघर जिल्ह्याध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला. यावेळी शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, कोपरी पाचपाखाडी विभाग अध्यक्ष महेश कदम, नैनेश पाटणकर व इतर या आंदोलनात सहभागी झाले होते.
जमील शेख हत्याप्रकरण : खरा सूत्रधार शोधावा, दरेकरांनी पोलीस आयुक्तांशी दूरध्वनीवरून साधला संपर्क