शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी भाजपच्या ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; मुहूर्त ठरला!
2
ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी एका चुकीमुळे धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात
3
Haryana Election : अग्निवीरला सरकारी नोकरी, महिलांना २१०० रुपये; भाजपकडून २० मोठी आश्वासने
4
काश्मीर, कलम ३७० बाबत पाकिस्तान, काँग्रेस-NC सोबत, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा
5
मद्यप्रेमींना दिलासा, फक्त ९९ रुपयांत मिळणार दारू, आणखी ३ तास उघडी राहणार दुकानं, 'या' राज्यात नवीन मद्य धोरण
6
IND vs BAN : जैस्वालची 'यशस्वी' खेळी; फिफ्टीसह खास विक्रमाला घातली गवसणी
7
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; ठाकरेंची डोकेदुखी वाढणार?
8
को-स्टारच्या प्रेमात वेडी झाली 'ही' अभिनेत्री; नातं वाचवण्यासाठी ठेवला काळ्या जादूवर विश्वास
9
बारामतीच्या दोन मुलींना हडपसरमध्ये दारु पाजली, मित्राच्या खोलीत चौघांकडून सामुहिक बलात्कार
10
हे चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकले नाहीत; वन नेशन, वन इलेक्शनवरून संजय राऊतांचा मोदींना टोला
11
कुछ बडा होने वाला है...! तेजस्वी यादवांनी बोलावली आमदार-खासदारांची तातडीची बैठक
12
पितृपक्ष: ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी प्रसन्न होईल; कायम मेहेरबान राहील, पितरांची कृपा लाभेल!
13
Vidhan Sabha Election: मुंबईतील 'या' सहा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत तिढा?
14
UNGA : पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर भारताची मोठी खेळी, 'या' देशांनी ठरावाच्याविरोधात केलं मतदान! 
15
MBBS प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी बदलला धर्म; 8 जणांचा प्रवेश रद्द, प्रकरण काय?
16
"मी कचरा करणार नाही", मराठी बोलताना अमिताभ बच्चन यांच्याकडून मोठी चूक, मागितली माफी, म्हणाले...
17
रक्ताच्या थारोळ्यात पडला होता भाजपा नेता; पोलिसाने लुटली सोन्याची चेन, ४ अंगठ्या, २ मोबाईल
18
Pitru Paksha 2024: महालय आणि श्राद्ध यात फरक काय? पितृपक्षात दोन्ही शब्दांचा का होतो वापर?
19
Pitru Paksha 2024: घरातल्या भिंतीवर पूर्वजांच्या लावलेल्या तसबीरींची दिशा तपासून बघा; वास्तुदोष टाळा!
20
रिकाम्या सीटवर बसण्याठी धावला अन् रेल्वेतून खाली पडला; सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू

भर पावसात गांधीजींच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडीचे ठाण्यात मूक आंदोलन

By सुरेश लोखंडे | Published: August 24, 2024 3:28 PM

बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ, अत्याचार ग्रस्त बालिकांच्या न्यायासाठी ही मूक निदर्शने महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली ठाण्यात पार पडली.

ठाणे जिल्ह्यातीलबदलापूर येथील सुप्रसिध्द शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आराेप करून या घटनेच्या निषेधार्थ व त्यातील गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी महाविकास आघाडीतर्फे आज ताेंडाला काळ्या पट्या बांधून, हातात काळे झेंडे घेत, मौन व्रत धारण करीत मूक निदर्शने करण्यात आली. यामध्ये अन्यही राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या कार्यकत्यांचा समावेश आढळून आला.

बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ, अत्याचार ग्रस्त बालिकांच्या न्यायासाठी ही मूक निदर्शने महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली ठाण्यात पार पडली. तलावपाळी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आज एकत्र येऊन ही मूक निदर्शने केली. तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून, हातात काळे झेंडे घेत, मौन व्रत धारण करीत ही मूक निदर्शने आज करण्यात आली. या निदर्शनात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नसीम खान, ठाणे काँग्रेस चे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, काँग्रेस प्रदेश सचिव मनोज शिंदे, प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत पाटील, सचिव संतोष केणे, ठाणे काँग्रेस ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे,राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुहास देसाई,काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह महिला आघाडी, अन्य पक्ष व सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते या आंदाेलनात संख्येने सहभागी झाले होते.

या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्यभरासह देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेने समाजातील विविध घटकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, लोक मोठ्या संख्येने आपला आक्रोश व्यक्त करत आहेत. संतप्त झालेल्या बदलापूरकरांनी उत्स्फूर्त आंदोलन करीत रेल्वे स्थानकात रेल रोको करून या घटनेतील गुन्हेगारांवर कारवाईची मागणी लावून धरली. त्यांच्या या आंदाेलनास पाठिंबा देऊन घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाउीच्या सर्व घटक पक्षांसह अन्यही राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी एकत्र येत आज ठाण्यात ही मूक निदर्शने करून निषेध व्यक्त केला

टॅग्स :thaneठाणेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीbadlapurबदलापूर