ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्लाझ्मा या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे. त्यानुसार शहरातील तीन ठिकाणी प्रत्येकी १०० मेट्रीक टन कचºयावर या तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया केली जाणार आहे. परंतु सलग सहावेळा निविदेला मुदतवाढ देऊनही प्रतिसाद मिळालेला नाही. असे असतांनाही केवळ ठराविक ठेकेदारालाच हे काम मिळावे म्हणूनच हा अट्टाहास केला जात असल्याचा आरोप आता पालिकेवर होऊ लागला आहे. त्यातच हे तंत्रज्ञान इतर देशांमध्ये सपशेल फेल ठरल्याने पालिकेनेसुध्दा ते रद्द करावे अशी मागणी केली जात आहे.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून हे अत्याधुनिक तंत्रज्ञान शहरात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या तंत्रज्ञानाअंतर्गत शहरात जमा होणाºया सर्व प्रकारच्या कचºयाचे वर्गीकरण न करता तो एका मशीनमध्ये टाकून अतिउच्च तापमानात जाळला जातो. यामुळे निर्माण होणाºया राखसदृष्य पदार्थापासून विटा किंवा तत्सम वस्तु तयार करुन त्याचा वापर करता येऊ शकतो. परंतु हे अतिशय घातक असून ते आजूबाजूच्या परिसरासाठीसुध्दा धोकादायक ठरु शकणार आहे. शिवाय इतर देशांमध्येसुध्दा अतिशय खर्चीक ठरत असलेले हे तंत्रज्ञान अपयशी ठरले आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेचा या तंत्रज्ञानासाठी अट्टाहास कशासाठी असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. त्यातही अटी आणि शर्तींच्या गोंधळामुळे अद्यापही सहा वेळा मुदतवाढ देऊनही या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यानंतरही पालिकेने हट्ट सोडलेला नाही. केवळ अनुदान थांबू नये म्हणून पालिकेने हा अट्टाहास केला असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात दक्ष नागरिक चंद्रहास तावडे यांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांना पत्र दिले असून, वारंवार मुदतवाढ देण्यापेक्षा खर्चिक आणि आरोग्याला घातक ठरणाºया या तंत्रज्ञानाऐवजी दुसरा प्रकल्प पालिकेने हाती घ्यावा, अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे.