मीरा रोड : भार्इंदरच्या खारीगाव भाजी मार्केटमधील महाराजा ऊर्फ मानसरोवर लॉजवर पोलिसांनी धाड टाकून देहविक्रय व्यवसायात गुंतलेल्या १३ पीडितांना सुधारगृहात पाठवले, तर ६ ग्राहक व ८ कर्मचारी व चालक अशा १४ जणांना पीटा कायद्याखाली अटक केली आहे . पोलीस उपअधीक्षक सुहास बावचे यांनी मध्यरात्रीच्या सुमारास सदर लॉजवर धाड टाकली. ठाणे न्यायालयाने लॉजचे कर्मचारी व चालक या आठ जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावल्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
भार्इंदरमध्ये लॉजच्या धाडीत १३ जणींसह सहा ग्राहक अटकेत
By admin | Published: January 23, 2016 11:12 PM