लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: नोकरीच्या आमिषाने प्रियकरानेच कुंटणखान्यात लोटलेल्या २२ वर्षीय तरुणीसह सहा तरुणींची ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने भिवंडीच्या हनुमान टेकडी भागातून शनिवारी रात्री सुटका केली. यामध्ये एका अल्पवयीन तरुणीचाही समावेश आहे. याप्रकरणी कुंटणखाना चालविणारी बिनू तामंग (३४) या महिलेलाही अटक करण्यात आली आहे.भिवंडीच्या हनुमाननगर भागात सीमा आन्टी आणि बिनू तामंग या कुंटणखाना चालविणाऱ्या महिला काही ठराविक रक्कम स्विकारुन अल्पवयीन मुलींनाही शरीरविक्रयासाठी पाठवित असल्याची माहिती ‘इंटरनॅशनल जस्टीस मिशन’ (आयजेएम) या सामाजिक संस्थेमार्फत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त दिपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली दौंडकर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाटील, जमादार राजू महाले, हवालदार अविनाश बाबरेकर, पोलीस नाईक निशा कारंडे, अक्षदा साळवी, विजय बडगुजर, विजय पवार आणि राजन मोरे आदींच्या पथकाने शनिवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास हनुमान टेकडी भागातून एका १७ वर्षीय मुलीसह २० ते २२ वयोगटातील सहा तरुणींची सुटका केली. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात दलाल बिनू हिच्यासह तिघांविरुद्ध पिटा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंटणखाना चालविण्यासाठी खोली भाडयाने देणाºया पप्पू हजाम याचाही आरोपींमध्ये समावेश आहे. गिºहाईकांकडून एक हजार रुपये घेऊन स्वत:कडे सातशे ते आठशे रुपये ठेवून उर्वरित पैसे ती या मुलींना द्यायची. कधी तेही पैसे या मुलींना दिले जात नसे, अशीही माहिती तपासात समोर आली आहे...........................सुटका केलेल्या मुली नेपाळच्यासुटका केलेल्या सहापैकी चार मुली नेपाळमधील असून दोन मुली कर्नाटकातील आहेत. त्यापैकी एक अल्पवयीन आहे. दुस-या २२ वर्षीय मुलीला तिच्याच प्रियकराने नोकरीचे अमिष दाखवून या व्यवसायात ढकलल्याची बाब समोर आली आहे...................महिला अधिका-याला मारली मिठीआपली या नरकयातनेतून पोलिसांनी सुटका केल्याचे या सहा मुलींना समजल्यानंतर त्यांच्यापैकी एका तरुणीने सुटका करणा-या पथकातील पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाटील यांना घट्ट मिठी मारली. त्यावेळी उपस्थित अधिका-यांनाही गहिवरुन आले.