ठाणे : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पाच हजार ८८७ हेक्टरवरील पिकांसह शेत जमिनीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची वस्तुस्थितीची दोन दिवशीय पाहाणी केंद्रीय पथकाने आज ठिकठिकाणी जावून केली. शनिवारी पाऊस असतानाही छत्र्यांच्या सहाय्याने पथकातील अधिकाऱ्यांनी पीक व जमीन नुकसान पाहणी केली आहे. केंद्र शासनाच्या या पीक नुकसान पाहणी पथकाकडून शुक्रवारी, शनिवार या दोन दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील भात पिकासह शेत जमिनीच्या नुकसानीची पाहाणी केली. शुक्रवारी रायगडहून येताना या पथकास वाहतूक कोंडीचा फटका बसला. पेण जवळील अमरापूर परिसरात वाहतूक कोंडीत अडकले होते. तरी शुक्रवारी संध्याकाळी बारवी येथील विश्रामगृहात गेल्यानंतर पीक पाहणीचे प्रजेंटेशन जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना देऊन आज सकाळीच नियोजनानुसार अंबरनाथ तालुक्यातील कसगांव येथील पीक नुकसानीची पाहाणी केली.
बदलापूर जवळील हेंदरेपाडा, रमेशनगर येथील नुकसान ग्रस्त घरांची पाहाणी या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.कल्याण तालुक्यातील आणे, वासुंद्री, कोंढेरी येथील भात पिकांच्या नुकसानीची पाहणी या केंद्रीय पथकाने केली. यामध्ये केंद्राच्या इलेक्ट्रीकल अॅथोरीटीचे सह संचालक ओम किशोर यांच्यासह केंद्रीय पाणी आयोगाचे संचालक मिलिंद पानपाटील , केंद्राच्या रस्ते वाहतूक महामार्गाचे अधिक्षक अभियंता संजय जैस्वाल, पीएफसीचे संचालक चित्तरंजन दास आदी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांसह ठाणेजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावने, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अंकूश माने, कृषी उपसंचालक सावंत, तालुका कृषी अधिकारी शिल्हा निखाडे, संजय पायस, रामचंद्र घुडे आदी अधिकारी या पीक, शेत जमीन नुकसान पाहणी पथकात सामाविष्ठ होते. या केंद्रीय पाहणी पथकाने जिल्ह्यातील पाच हजार ८०० हेक्टर पीकां नुकसानीची पाहणी केली. तर ८७ हेक्टर शेत जमिनीच्या नुकसानीची देखील वस्तुस्थिती पाहणी या केंद्रीय पथकामने केली. या पाहणी दौऱ्यांत कल्याण तालुक्यात वसात- शेलवली येथील पीक नुसानीच्या पाहणीसह आणे व भिसोळ येथील घरांच्या आणि पिकांच्या नुकसानीची पाहणीचे नियोजन करण्यात आलेले होते. त्याुनसार या पथकाने पाहणी केली. यामध्य कल्याण तालुक्यातील वसुंद्री व सांगोडे येथील पीक नुकसान पाहणी देखील या दौऱ्यांत करण्यात आली. या पाहणीच्या वेळी मात्र पाऊस ठिकठिकाणी असतानाही छत्रीचा वापर करून भर पावसात संबंधीत शेत जमीन व पीक नुकसान शेतावर प्रत्यक्ष जावून करण्यात आल्याचे आढळून आले. जिल्ह्यात गेल्या महिन्यातील २६ व २७ जुलै या दोन दिवसांसह ४ आॅगस्ट च्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे नदी नाल्यांना पूर आला. या पुराच्या पाण्याचा निचरा वेळेत न झाल्यामुळे निवासी वस्त्यांमध्ये पाणी शिरले. यामुळे जिल्ह्यातील दहा हजार २७५ खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहेत. तर एक हजार ५१८ घरांची पूर्णत: तर काहींची अशंता पडझड झाली. जिल्ह्याभरात तब्बल २७ जणांचा या पूर आपत्तीत मृत्यू झाला. तर या अतिवृष्टीमुळे सहा हजार १०० कुटुंबांना व ५०० व्यक्तींना तात्पुरत्या स्वरूपात निराधार व्हावे लागले होते. एवढेच नव्हे तर गायी, म्हशी, शेळ्यामंढ्या सारख्या १०४ जनावरे पुराच्या पाण्यात दगावली आहेत. तर सुमारे पाच हजार ८८७ हेक्टरवरील भातपीक नष्ठ झाले आहे. याशिवाय ८७ हेक्टरवरील शेत जमीन या पूरस्थितीत नापीक झाल्याची जिल्हह्यातील शेतकºयांकडून ऐकायला मिळत आहे.................फोटो - ३१ ठाणे केंद्रीय पथक