ठाणे - ठाणे परिवहन समितीमधील सहा सदस्य चिठ्ठी काढून निवृत्त झाले. परंतु यामध्ये विद्यमान सभापती अनील भोर यांच्या नशीबी मात्र घोर निराशा आली. त्यांनी त्यांच्याच नावाची पहिली चिठ्ठी काढली. त्यांच्यापोठापाठ शिवसेनेचे एकूण दोन, राष्ट्रवादीचे तीन आणि कॉंग्रेसचे एक सदस्य चिठ्ठीद्वारे निवृत्त झाला आहे. यामध्ये नव्या पक्षीय बलाबलाचा फायदा आता शिवसेनेलाच होणार असला तरी भाजपाची एन्ट्री मात्र परिवहनमध्ये पक्की मानली जात आहे. शिवाय कॉंग्रेसची परिवहनमधून कायमची एक्झीट झाली आहे. ठाणे परिवहन समितीमधील सहा सदस्यांचा कार्यकाळ ३१ मार्च रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे एक महिनाआधीच चिठ्ठी काढून यातील सहा सदस्य निवृत्त केले जाणार होते. त्यानुसार मागील महिन्यात २८ फेब्रुवारी रोजी या संदर्भात विशेष सभा बोलविण्यात आली होती. परंतु या सभेबाबत सर्वपक्षीय खास करुन शिवसेनेच्या सदस्यांनी आक्षेप घेत ही सभा तहकुब केली होती. त्यानंतर बुधवारी ही सभा पुन्हा लावण्यात आली. त्यानुसार सभापती अनिल भोर यांच्यावर चिठ्ठी उचलण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. परंतु त्यांनी पहिली चिठ्ठी उडविली आणि नेमकचा त्यांचा नंबर हा निवृत्तीमध्ये लागला. त्यानंतर शिवसेनेचे साजन कसार, राष्ट्रवादीचे तकी चेऊलकर, हेमंत धनावडे, सरेंद्र उपाध्याय हे राष्टÑवादीचे तीनही सदस्य निवृत्त झाले. तर कॉंग्रेसचे एकमेव सदस्य सचिन शिंदे यांच्या नावाची देखील चिठ्ठी निघाल्याने त्यांना देखील आता घर वापसी करावी लागली आहे.२०१६ ला त्यावेळच्या ठाणे महापालिकेतील पक्षीय नगरसेवकांच्या संख्याबळानुसार निवडणूक झाली होती. यामध्ये शिवसेनेचे सात, मनसेचा एक, कॉंग्रेसचा एक आणि राष्ट्रवादीचे तीन सदस्य समितीवर गेले होते. दरम्यान २०१७ रोजी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीनंतर पक्षीय बलाबल बदलले असून शिवसेना ही एकहाती सत्तेवर आली आहे. त्यामुळे चिठ्ीत त्यांचे केवळ दोन सदस्य जरी बाहेर गेले असले तरी नव्या समीकरणानुसार सुमारे तीन सदस्य त्यांचे समितीवर येण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीला मात्र मोठा फटका असला आहे. त्यांचे तीनही सदस्य बाहेर गेल्याने नव्या समीकरणानुसार केवळ एक ते दोनच सदस्य समितीवर जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कॉंग्रेसचे मात्र चिठ्ठीमुळे पाणीपत झाले आहे. नव्या समीकरणानुसार आता कॉंग्रेसचा एकही सदस्य परिवहनमध्ये जाणार नसल्याने त्यांची परिवहनची कवाडे बंद झाली आहेत.दरम्यान आता नव्या समीकरणानुसार भाजपाचा देखील आता परिवहनमध्ये शिरकाव होणार आहे. भाजपाचे २३ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यानुसार २२ ला एक या निकशानुसार भाजपाचा एक सदस्य परिवहनमध्ये जाणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. एकूणच चिठ्यांमध्ये शिवसेनेचे सभापती भोर यांची विकेट पडली असली तरी देखील त्यांचे जास्तीचे सदस्य बाहेर न गेल्याने ही त्यांच्यासाठी जमेची बाजू मानली जात आहे. तसेच नव्या समीकरणानुसार पुन्हा परिवहन समिती ही शिवसेनेच्याच ताब्यात राहणार हे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.
ठाणे परिवहन समितीचे सहा सदस्य चिठ्ठी उडवून झाले निवृत्त, सभापतींनी काढली स्वत:चीच चिठ्ठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 5:51 PM
ठाणे परिवहन समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने सहा सदस्य चिठ्ठी काढून निवृत्त झाले. परंतु यामध्ये विद्यमान सभापती अनील भोर यांनी आपल्याच नावाची चिठ्ठी काढल्याने सभापती पद देखील आता रिक्त झाले आहे. असे असले तरी परिवहन समिती ही शिवसेनेकडेच राहणार आहे.
ठळक मुद्देकॉंग्रेसची परिवहनची एन्ट्री बंदभाजपाचा होणार शिरकाव