लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील आणखी सहा पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये एका कारागृह पोलिसांचाही समावेश आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांची संख्या आता १२३ वर पोहचली आहे.ठाणे आयुक्तालयातील उल्हासनगर परिमंडळातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल, वागळे इस्टेट परिमंडळातील श्रीनगर पोलीस ठाण्याची महिला कॉन्स्टेबल यांना २६ मे रोजी कोरोनाची लागण झाली. तर मुख्यालयातील आणखी एक कॉन्स्टेबल तसेच कळवा पोलीस ठाण्याचे दोघे कर्मचारी अशा तिघांना २७ मे रोजी लागण झाल्याचे समोर आले. यातील एकावर पनवेल येथील इंडिया बुल रुग्णालयात तर दोघांवर अनुक्रमे कालसेकर आणि निआॅन या दोन खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.दरम्यान, ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातही कोरोनाचा शिरकाव झाल्याची बाब समोर आली आहे.ठाणे जिल्ह्यातील मध्यवर्ती आणि आधारवाडी कारागृहात विशेष दक्षता घेण्यात येत आहे. एकीकडे कोरोनाला रोखण्यासाठी खबरदारीच्या सर्व उपाय योजना करण्यात येत असतांनाच ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील एका कर्मचायालाही कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. डयूटीवर असतांना २३ मे रोजी या कर्मचाऱ्याला त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्याची कळव्यातील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयात तपासणी करण्यात आली. या तपासणीत त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याला आता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या संपर्कातील इतर कर्मचारी अधिकाऱ्यांचीही तपासणी लवकरच केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. आतापर्यंत १४ अधिकारी आणि १०८ कर्मचाऱ्याना कोरोनाची लागण झाली आहे. कारागृहातील या कर्मचाऱ्यामुळे ही संख्या आता १२३ च्या घरात पोहचली आहे.
ठाण्यातील आणखी सहा पोलिसांना कोरोनाची लागण: कारागृहातील शिपायाचाही समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 11:36 PM
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील सहा कर्मचाऱ्यांसह ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील एका कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण झाल्याची बाब गुरुवारी समोर आली आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.
ठळक मुद्देकळव्यातील दोघांचा समावेशश्रीनगरच्या आणखी एका महिलेलाही लागण