ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत विविध पक्षातील १४ दामप्त्ये निवडणुकीच्या रिंगणात आपले राजकीय नशीब आजमावत होती. त्यातील सहा दामप्त्ये पुन्हा विजयी झाली. चार दामप्त्यांचा पूर्ण पराभव झाला आणि चार ठिकाणी पती-पत्नीपैकी एकाचा पराभव झाला. यंदा विविध पक्षातील तब्बल १४ दामप्त्ये राजकीय नशीब आजमावत होती. यात राष्ट्रवादीतर्फे प्रभाग क्र. २३ अ मधून मिलिंद पाटील आणि त्यांची पत्नी मनाली या २५ ब मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. परंतु मिलिंद पाटील विजयी आणि मनाली पराभूत झाल्या. प्रभाग क्र. २४ ब मधून मनीषा साळवी आणि त्यांचे पती महेश २५ अ मधून निवडणूक लढवित होते. प्रभाग क्रमांक ४ मधून एच. एस. पाटील आणि त्यांच्या पत्नी कल्पना प्रभाग क्र. ७ मधून निवडणुकीच्या रिंगणात होत्या. यातील एच. एस. पाटील यांचा पराभव झाला असून कल्पना निवडून आल्या. प्रभाग चारमधून भाजपाचे शेरबहादूर सिंग आणि पत्नी आशा रिंगणात होत्या. त्यापैकी आशादेवी विजयी झाल्या. प्रभाग क्र. २६ अ मधून अनिता केणी आणि त्यांचे पती राजन हे प्रभाग क्र. ३१ ड मधून निवडणूक लढवित होते या दोघांचाही विजय झाला आहे. प्रभाग २३ मधून राष्ट्रवादीचे प्रमिला आणि मुकुंद केणी हे दामप्त्यही विजयी झाले आहे. राष्ट्रवादीचे राजण किणे आणि त्यांच्या पत्नी अनिता किणे हेही निवडून आले आहेत. याशिवाय प्रभाग क्रमांक ८ मधून संजय भोईर आणि त्यांच्या पत्नी उषा यांनी विजयरथ कायम ठेवला आहे. प्रभाग क्रमांक ११ मधून कृष्णा आणि नंदिनी पाटील हे दामत्य निवडून आले आहे. बसपामधून भाजपात आलेले विलास कांबळे आणि त्यांच्या पत्नी सुवर्णा यांचेही नाव प्रथमच या यादीत आले आहे. प्रभाग क्र. १५ ब मधून एकनाथ भोईर आणि प्रभाग क्र. १७ अ मधून त्यांच्या पत्नी एकता यांचा विजय झाला आहे. प्रथमच प्रभाग क्रमांक २७ क आणि ड मधून विजय भोईर आणि त्यांच्या पत्नी संगीता या निवडणुकीत आपले नशीब आजमावत होते. परंतु त्यांचा पराभव झाला आहे. त्यांच्याखालोखाल महेश्वरी आणि संजय तरे या शिवसेनेच्या दाम्पत्याचाही पराभव झाला आहे. कॉंग्रेसमध्ये प्रभाग क्र. २७ क मध्ये रेश्मा भोईर आणि त्यांचे पती नीलेश हे ड मधून निवडणूक लढवित होते. परंतु ते पराभूत झाले. प्रभाग क्र. १५ ब मधून मनसेच्या उर्मिला माने आणि त्यांचे पती अनिल माने यांचाही या निवडणुकीत पराभव झाला. (प्रतिनिधी)
ठाण्यात १४ पैकी सहा दाम्पत्ये विजयी
By admin | Published: February 24, 2017 7:08 AM