ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तीन लाेकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रचार सध्या जाेर धरत आहे. त्यास अनुसरून जिल्ह्यात केंद्रीय खर्च निरिक्षकांनी त्यांच्या मतदारसंघाचा ताबा घेऊन चाचपणी सुरू केली आहे. त्यास अनुसरून आज घेतलेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील भिवंडी पूर्व, ओवळा माजीवाडा आणि ऐराेली हे तीन विधानसभा मतदारसंघ त्यांनी संवेदनशील म्हणून घाेषीत करून त्यावर कडक लक्ष ठेवण्याचे धडे नाेडल अधिकाऱ्याना दिले. या विधानसभांच्या आधी जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागामधील तब्बल सहा मतदान केंद्र आधी संवेदशीन म्हणून घाेषीत करण्यात आलेले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृह, नियोजन भवन निवडणूक खर्चाच्या अनुषंगाने आज आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षते पार पडलेल्या या बैठकीत निवडणुकीशी संबंधित केवळ वरिष्ठ अधिकारी वर्ग उपस्घ्थित हाेता. त्यांच्याकडून या निवडणूक कामाचा आढाव भिवंडी लाेकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक चित्तरंजन मांझी, कल्याण मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक नकुल अग्रवाल आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक. चंद्र प्रकाश मीना व राहील गुप्ता आदींनी आतापर्यंतच्या कामाची झाडाझडती घेत पुढील कामकाजाच्या दृष्टीने मार्गदर्शन करून जिल्ह्यातील या तीन विधानसभा संवेदनशील असल्यामुळे त्यातील कामकाजाच्या दृष्टने आवश्यक मार्गदर्शन यावेळी या केंद्रीय निरिक्षकांनी अधिकाऱ्यांना दिले.
भिवंडी लाेकसभेमधील भिवंडी पूर्व या विधानसभेप्रमाणेच ठाणे लाेकसभेमधील ओवळा माजीवाडा आणि ऐरोली दाेन विधानसभा मतदारसंघाना संवेदनशील घाेषीत करण्यात आले आहेत. त्यास अनुसरून या बैठक्ीत या केंद्रीय निरिक्षकांनी जाेरदार चर्चा केली. त्यास अनुसरून या विधानसभामधील नोडल अधिकाऱ्यांना या ठिकाणी जास्त लक्ष केंद्रीत करुन कायदा व सुव्यवस्थेबाबत योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही आढवा बैठकीत केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांनी दिल्या. सर्व विभागांचे अधिकारी हे आपापले काम करीत असताना जर एखादी बाब आपल्या अखत्यारित नसेल पण जर त्या ठिकाणी काही आढळून आल्यास ते संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तातडीने माहिती देतील, अशी अपेक्षा व्यक्त करीत आपण सर्वजण करीत असलेले निवडणुकीचे काम हे टीम वर्क आहे. त्यामुळे व्हॉटसॲप ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत प्रत्येकांने काम करावयाचे आहे, असेही या केंद्रीय खर्च निरीक्षकांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले.
संवेदनशील मतदान केंद्र -विधानसभेचे नाव - मतदान केंद्राचे नाव - संवेदनशीलचे कारणभिवंडी ग्रामीण - वारेठ - ६.१९ टक्के मतदानशहापूर - दापूर - ०० टक्के मतदान
शहापूर - फुगाळे - ७.४२ टक्के मतदानभिवंडी पूर्व - केंद्र क्र. १४६ शांतीनगर, वार्ड नं.४१ - १०.०९ टक्के मतदान
भिवंडी पूर्व - केंद्र क्र. १४२ शांती नगर - ७.५१ टक्के मतदानऐराेली - शाळा क्र. ४० महापे, रूम नं.१ - ७.९२ टक्के मतदान