शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
4
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
5
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
6
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
7
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
8
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
9
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
10
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
11
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
12
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
13
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
14
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
15
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
16
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
17
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
18
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
19
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
20
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती

कल्याणमध्ये अडवले स्कायवॉक : वारांगना, रिक्षाचालकांमुळे पादचारी त्रस्त,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 6:12 AM

एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेनंतर रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाले हटवण्याकरिता केडीएमसी आणि रेल्वे प्रशासनाने मोहीम उघडली आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमणातून मुक्त झालेल्या स्कायवॉकचा कब्जा वारांगनांनी घेतला आहे.

- प्रशांत मानेकल्याण : एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेनंतर रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाले हटवण्याकरिता केडीएमसी आणि रेल्वे प्रशासनाने मोहीम उघडली आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमणातून मुक्त झालेल्या स्कायवॉकचा कब्जा वारांगनांनी घेतला आहे. त्याच वेळी बेशिस्त रिक्षाचालकांमुळे होणाºया कोंडीचा स्कायवॉकला विळखा पडत आहे. त्यामुळे स्कायवॉकवरून चालत जावे, तर वारांगनांचा त्रास आणि स्कायवॉक टाळून रस्त्याने जावे तर फेरीवाले, रिक्षावाल्यांच्या मनमानीचा मनस्ताप, अशा कोंडीत नागरिक सापडले आहेत. स्कायवॉकवरील अनैतिक धंद्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष सुरू असून रेल्वेस्थानक परिसरातील बेशिस्त कोंडीकडे आरटीओ, वाहतूक आणि शहर पोलिसांनी कानाडोळा केला आहे.फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाविरुद्ध रेल्वे प्रशासनाकडून जेवढ्या प्रभावीपणे कारवाई सुरू आहे, तेवढी प्रभावी कारवाई केडीएमसीकडून होताना दिसत नाही. डोंबिवलीचा अथवा कल्याणच्या स्कायवॉकवर दिवसभर तुरळक प्रमाणात फेरीवाल्यांचे अतिक्रमण दिसून येते. मात्र, स्कायवॉकचा जो भाग मोकळा केला आहे, तेथे वारांगनांचा उपद्रव वाढला आहे. डोंबिवली पश्चिमेकडील रेल्वे पुलाला लागून असलेल्या स्कायवॉकवर सायंकाळी वारांगना असतात, तर कल्याणला संत रोहिदास चौकाकडे जाणाºया स्कायवॉकचा ताबाही वारांगनांनीच घेतला आहे. साहजिकच, या स्कायवॉकवर वारांगना, त्यांचे गिºहाईक आणि अनैतिक व्यवसायातील मंडळींचा सुळसुळाट असल्याने सर्वसामान्य पादचारी व प्रामुख्याने महिला-मुली या स्कायवॉकचा वापर करणे टाळतात. कल्याण व डोंबिवलीतील पोलिसांचे याकडे एकतर साफ दुर्लक्ष झाले आहे अथवा पोलिसांचे लागेबांधे असल्याने राजरोस शरीरविक्रय करणाºयांना त्यांनी खुली सूट दिली आहे. यापूर्वी स्थानिक एमएफसी पोलिसांकडून कारवाई झाली होती. परंतु, गेल्या कित्येक दिवसांत पोलिसांच्या गस्तीअभावी वारांगनाचा मुक्त संचार बोकाळल्याचे चित्र आहे.रिक्षाचालकांना शिस्त कधी लागणार?कल्याण-डोंबिवलीत बहुतांश रिक्षा स्टॅण्ड बेकायदा आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसराला बकालपणा आला आहे. रिक्षाचालक रेल्वे स्थानक परिसरात मनमानी पद्धतीने रांगा लावतात.केवळ दूरवरची भाडी स्वीकारायची व जवळच्या प्रवाशांसोबत उर्मटपणे वागायचे, मनाला येईल ते भाडे मागायचे, अशी गुंडगिरी रिक्षाचालक करत आहेत. स्कायवॉकच्या ठिकाणी एकाला एक खेटून रिक्षा उभ्या करून ते लोकांचा स्कायवॉककडे जाण्याचा मार्ग अडवत आहेत.इंदिरा गांधी चौकात, तर रिक्षाचालकांच्या बेशिस्तीचा कळस गाठलेला दिसतो. केडीएमटीच्या बस व अन्य वाहनांना तेथून मार्ग काढणे जिकिरीचे होऊन बसते. स्थानकापासून केडीएमटीची बससेवा सुरू होऊ नये, यासाठी हेतुत: ही बजबजपुरी माजवली गेली आहे.रिक्षाचालकांच्या भगव्यापासून लाल बावट्यापर्यंत डझनभर युनियनची टर्रेबाजी करत फिरणारे नेते, आरटीओ व वाहतूक पोलीस यांच्या हप्तेबाजीच्या संघटित गुन्हेगारीमुळेच पादचारी व रिक्षा प्रवासी त्रस्त आहेत.

टॅग्स :kalyanकल्याण