शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

लहान धरणांचे सर्वेक्षण कागदावरच

By admin | Published: April 20, 2016 2:11 AM

ठाणे जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता जवळपास लहान ६० धरणे बांधता येतील. त्यासाठी कोकण लघू पाटबंधारे विभागाने १० वर्षांपूर्वी सर्वेक्षण झाले आहे.

मुरलीधर भवार, कल्याणठाणे जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता जवळपास लहान ६० धरणे बांधता येतील. त्यासाठी कोकण लघू पाटबंधारे विभागाने १० वर्षांपूर्वी सर्वेक्षण झाले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणीच अजूनही सरकारने केलेली नाही. ही अंमलबजावणी वेळीच झाली असती तर आज जिल्ह्यातील पाण्याची समस्या इतकी बिकट झाली नसती, अशी माहिती कोकण लघु पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष व भाजपा आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे. कथोरे यांनी सांगितले की, २००५ ते २००९ दरम्यान ते कोकण लघु पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष होते. त्यावेळी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडून स्वत:चा जलसाठा तयार करण्यासाठी प्रस्ताव मागविले होते. एकाही स्थानिक स्वराज्य संस्थेने धरणासाठी प्रस्ताव पाठविला नाही. आज जिल्ह्यातील नागरिकांना ३० टक्के पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे. तर ३५ टक्के पाण्याची गळती आहे. प्रत्यक्षात नागरिकांना ३५ टक्केच पाणीपुरवठा होत आहे. या पाण्यावरच जिल्ह्यातील दीड कोटी नागरिकांची तहान भागविली जात आहे. पाण्याची गळती रोखल्यास नागरिकांना जादा पाणी मिळू शकेल. गळती रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न नाहीत. सरकारी यंत्रणाही ढिम्म आहेत. जिल्ह्यात लहान धरणे तयार करण्याचे प्रस्ताव सरकार दरबारी प्रलंबित आहेत, असे ते म्हणाले. लहान धरणाचा जलसाठा १८ ते ३० दशलक्ष लिटर इतका असतो. त्यातून आसपासच्या नागरिकांची तहान भागू शकते. परिणामी उल्हास नदीतून पाणी उचलल्यामुळे पडणारा ताण कमी होईल. तसेच जास्तीचे पाणी टंचाईग्रस्त भागाला देता येईल. स्थानिक स्वराज्य संस्था नव्या इमारतींच्या बांधकामाला परवानगी देतात. मात्र, या संस्था तेथे राहण्यास येणाऱ्या नागरिकांसाठी पाण्याचे नियोजन करीत नाही. त्यात बेकायदा बांधकामे वाढत आहेत. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही. पाणीचोरांवरही कारवाई होत नाही. त्याची झळ जिल्ह्याला बसते आहे. कोंढाणेचे नियोजन फसले, पोशीर भूसंपादनाच्या कचाट्यातकोंढाणे धरणाचे नियोजन फसले आहे. कर्जतनजीकचे पोशीर धरण भूसंपादनाच्या कचाट्यात सापडले आहे. मोठ्या धरणांसाठी वनविभाग व पर्यावरण परवानग्या मिळणे कठीण होते. किमान लहान आकाराची धरणे मार्गी लागल्यास त्यांच्या उभारणीसाठी लागणारा वेळ आणि खर्च कमी लागतो असे कथोरे यांनी सांगितले.सह्याद्रीच्या फूटहिल्स समजल्या जाणाऱ्या मलंगगडाच्या डोंगरातून वाहून येणारे पाणी कल्याण खाडीला मिळते. तेथे कुशीवली धरणाचा प्रस्ताव आहे. बदलापूर येथे भोज धरणाचा प्रस्ताव आहे. तसेच इंदगावचे धरण प्रस्तावित आहे. चिंचवली येथेही धरणे होऊ शकते. या लहान धरणांचे सर्वेक्षण झाले आहे. त्याची अंमलबजावणी तत्कालीन आघाडी सरकारने केली नाही.