ठाणे: येथील लघू म्हणजे स्माँल स्केल इंडस्ट्रियल असोसिएशन (टीआयएसए) च्या प्रतिनिधींनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि ठाणे महानगरपालिका आयुक्त विपिन शर्मा यांची भेट घेऊन ठाण्यातील सद्यस्थितीचा विचार करता सर्व लघूउद्योग व किरकोळ दुकाने सकाळी 6 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी सोमवारी केली.
या वेळेतील बदलासह या शिष्टमंडळाने परिसरातील लघू उद्योगांमध्ये ऑक्सिजन पुरवठा वाढविण्यासाठी आणि ठाण्यातील खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू करण्यास मान्यता देण्यासाठीही विशेष विनंती केली आहे. या प्रतिनिधीमंडळात जेष्ठ नेते लाल जैन, मूलचंद गाला, आशिष सिरसाट, टीआयएसएचे भावेश मारू, उदय परमार, अजित गानू, अशोक ताराचंद बडाला, पंकज नौलाखा, सुरेश.ठाकर, रणछोड पटेल, भावेश जैन, सुनील काबरा आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.