ठाणे : येथील साकेत मैदानावर सोमवारी महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहण समारोह उत्साहात पार पडला. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सरपंच, ग्रामसेवक, पोलीस आणि विद्यार्थ्यांना उत्कृष्ट कामिगरीबद्धल विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, पोलीस आयुक्त परम वीर सिंह, पोलीस अधीक्षक महेश पाटील, मनपा अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण आदी अधिकारी, लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. स्मार्ट ग्राम योजनेच्या तालुका स्तरावर निवड झालेल्या मुरबाड तालुक्यातील कासगाव, अंबरनाथमधील खरड, भिवंडीमधील महाळूंगे, शहापूरमधील वेहलोंडे आणि कल्याणमधील नागाव या ग्रामपंचायतींच्या सरपंचांचा यावेळी स्मार्ट ग्राम योजनेच्या तालुकास्तरीय पुरस्काराने सन्मात करण्यात आला. याशिवाय यशवंतरावजी चव्हाण यांच्या स्मरणार्थ ‘आदर्श गौरव ग्रामसभा’ पुरस्कार कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायत चावरे मसरूंडीला देण्यात अला. प्रशासनातील विशेष कामगिरीबद्धल जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक मनोज चौधरी, शहापूरचे तलाठी विजय किसान लोहकरे, जिल्हा माहिती अधिकारी अनिरु ध्द अष्टपुत्रे यांना गौरविण्यात आले. तर ‘राष्ट्रपती पुरस्कार स्काउट’ म्हणून गौरविलेले रितेश कांबळे, शुभ वैती, अथर्व प्रभावळे, पुनंग घेडा यांच्यासह ‘राष्ट्रपती पुरस्कार गाईड’ म्हणून आकांक्षा पराते, हर्षदा शिरीष कांबळे, शोभा जलधरी, प्रेक्षा मेहता, प्रिती सैल आणि वेडावती ठिपसे यांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव झाला.तलवारबाजी करणारी स्नेहल पवार , गौरांग आंबे्र ( मैदानी खेळ), बबन खरात (पॉवरलिफ्टिंग) आदींना यावेळी जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जिल्हा उद्योग पुरस्कार शहापूर तालुक्यातील आटगाव येथील फार्मा एअर मोड्युलर सिस्टीमचे भैयासाहेब पाटील, अंबरनाथमधील मेकोबर इंजिनिअरिंग सिस्टिम्सचे मुरलीधर कामत यांना प्रदान करण्यात आला. उपमुख्य क्षेत्ररक्षक बिमल नथवाणी यांना नागरी संरक्षण दलातील गुणवत्तापूर्ण सेवेबाबत पदक देण्यात आले . पोलीस महासंचालकांचे ग्रामीण जिल्ह्यासाठीचे पदक अनिल जरग, रवींद्र खंडाळे, वैभव सावंत या पोलीस कर्मचाऱ्यांना देऊन गौरविण्यात आले.याशिवाय पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळालेल्यांमध्ये पोलीस उपायुक्त पंढरीनाथ पवार, सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे, पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी, राजकुमार कोथमिरे, देविदास घेवारे, मनोहर पाटील, विजय डोळस, धुळा टेळे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल जगताप, प्रकाश सावंत, हवालदार राजू जोगी, अशोक जमधडे, विलास नलावडे, ज्योतिराम साळुखे, सुरेश राजे, वसंत शेडगे, ज्ञानदेव जाधव, प्रकाश शिरसाठ, दीपक जाधव, संतोष चौधरी, दीपक बैरागी, रवींद्र काटकर, भूपेंद्रसिंग राजपूत, प्रमोद चौधरी, संतोष शेडगे आदी पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
स्मार्ट ग्रामपंचायती, सरपंचांचा गौरव
By admin | Published: May 02, 2017 2:37 AM